Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचे काय होईल? आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले,...

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचे काय होईल? आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले,...

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले किंवा नाही बनले तरीही भारत आपल्या आर्थिक धोरणाच्या वाटेवर पुढे जात राहील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 05:15 PM2024-05-28T17:15:30+5:302024-05-28T17:19:12+5:30

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले किंवा नाही बनले तरीही भारत आपल्या आर्थिक धोरणाच्या वाटेवर पुढे जात राहील. 

Raghuram Rajan has commented on how India's economy will be if Narendra Modi becomes Prime Minister for the third time | मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचे काय होईल? आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले,...

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचे काय होईल? आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले,...

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातव्या टप्प्यातील मतदान ४ जून रोजी होणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी आणि एनडीएच्या प्रचारसभा सुरू आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुढील सरकारच्या आर्थिक धोरणाबद्दल विधान केले आहे. 

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले किंवा नाही बनले तरीही भारत आपल्या आर्थिक धोरणाच्या वाटेवर पुढे जात राहील. 

सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले, भारतीय धोरणात बरेच सातत्य आहे. कोणतेही सरकार आले तरी अनेक चांगल्या गोष्टी पुढे नेतील. नवीन सरकार लवकरच अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यामध्ये ती कामे पुढे नेण्यात येणार असून त्यात आणखी काय बदल करता येतील हेही पाहिले जाणार आहे. देशात पायाभूत सुविधांची मोठी कमतरता लक्षात घेता मोदी सरकारच्या काळात त्यावर खर्च करणे आवश्यक होते. पण पुढे जाऊन भारताला आपल्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्याचे फायदे मोठ्या कंपन्यांपर्यंत मर्यादित नसतील याची काळजी घ्यावी लागेल, असंही रघुराम राजन म्हणाले. 

२०२४ ते २०२६ दरम्यान देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर ५३४ अब्ज रुपये खर्च केले जातील, यामुळे २०३० पर्यंत नऊ टक्के आर्थिक विकास साधण्यात मदत होईल. मात्र ४ जून रोजी कोणाचे सरकार बनते यावर ते अवलंबून असेल. या निवडणुकीत भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल अशी चर्चा आहे. भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केल्यास आर्थिक आघाडीवर अनेक मोठ्या सुधारणा पुढे नेल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे. 

Web Title: Raghuram Rajan has commented on how India's economy will be if Narendra Modi becomes Prime Minister for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.