नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना, आपण सर्व बँकांना स्विफ्ट नेटवर्क तपासण्याचे आदेश दिले होते, तसेच मोठ्या बँक घोटाळ्यांची एक यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवून, बँकिंग तपासणी व कायदेपालन संस्थांकडून संयुक्त चौकशीची विनंतीही केली होती, असा गौप्यस्फोट रघुराम राजन यांनी केला.
नीरव मोदी व मेहुल चोकसीने केलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात स्विफ्ट नेटवर्कचा गैरवापर झाल्याचे आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राजन यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले, स्विफ्ट यंत्रणा सदोष असल्याचे बांगलादेशात उघड झाले होते. अशा समस्यांचा शोध लागताच बँकांना त्याची माहिती देण्याची जबाबदारी नियामकांची असते. दोष दुरुस्त करा, असे सांगणे आवश्यक ठरते. आम्ही तेच केले होते. बँकांना हे दोष दूर करण्यास सांगितले होते. बँकांनी हे आदेश पाळले नसतील, तर त्यांनी तसे का केले, हे समजून घेतले पाहिजे.
>शिक्षा न होणे ही मुख्य चिंता
घोटाळे उघडकीस येतात. मात्र, आरोपींना शिक्षा होत नाही, ही रिझर्व्ह बँकेची मुख्य चिंता होती. त्यामुळे आम्ही पंतप्रधान कार्यालयाला मोठ्या बँक घोटाळ््यांची एक यादी पाठविली होती.
आपण एकत्रितपणे घोटाळेखोरांचा शोध घेऊ या, असे आम्ही म्हटले होते, असेही राजन यांनी सांगितले.
>नेमकी कोणाला
दिली होती माहिती?
रघुराम राजन हे डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नेमक्या कोणत्या पंतप्रधानांना घोटाळ्यांची यादी दिली होती, याची माहिती राजन यांनी दिली नाही.
>काय असते स्पिफ्ट यंत्रणा? : स्विफ्ट यंत्रणा जगभरातील बँका व वित्तीय संस्थांमध्ये संपर्क स्थापित करण्याचे काम करते. बँका-बँकांमधील व्यवहार सुरक्षित व विश्वासार्ह व्हावेत, यासाठी ही यंत्रणा निर्माण केली गेली आहे.
>राजन यांनी उपस्थित केले मूलभूत प्रश्न
पीएनबी घोटाळ्यातील हमीपत्रे (एलओयू) का दिली गेली? त्यांची नोंदणी बँक व्यवस्थेत का केली गेली नाही? बँक व्यवस्थापनास याची माहिती होती का?
पंतप्रधानांना आधीच दिली होती घोटाळ्यांची यादी : रघुराम राजन
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना, आपण सर्व बँकांना स्विफ्ट नेटवर्क तपासण्याचे आदेश दिले होते, तसेच मोठ्या बँक घोटाळ्यांची एक यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवून, बँकिंग तपासणी व कायदेपालन संस्थांकडून संयुक्त चौकशीची विनंतीही केली होती, असा गौप्यस्फोट रघुराम राजन यांनी केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:49 AM2018-03-15T00:49:17+5:302018-03-15T00:49:17+5:30