Join us

‘नोबेल’ पुरस्कारासाठी रघुराम राजन यांचे नाव, उद्या होऊ शकते घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 8:50 AM

2008 च्या मंदीचा तीन वर्ष आधीच इशारा देणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली - 2008 च्या मंदीचा तीन वर्ष आधीच इशारा देणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्या सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे. सप्टेंबर

‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली आहे. या यादीत रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला  आहे. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्यसेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरतील.

वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार राजन हे त्या सहा अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांना क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्सने यावर्षी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वात कमी वयाचे (40) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले राजन हे 2005 मध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. राजन यांनी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केलं होतं. त्याचवेळी राजन यांनी आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकनोबेल पुरस्कार