सुरत : हाँगकाँगमध्ये हिऱ्यांच्या तस्करीप्रकरणी एका स्थानिक जोडप्यास अटक केल्यानंतर चिनी अधिकाºयांनी छापेमारी सुरू केल्यामुळे भारतातील हिरे व्यावसायिक हादरले आहेत. सुरत आणि मुंबई येथील व्यावसायिक संस्थांनी हाँगकाँगमधील आपल्या कार्यालयांत फोनाफोनी सुरू केली आहे.
रत्ने व आभूषण व्यवसायातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, गुजरातच्या सुरत शहरातील एका हिरे व्यावसायिकास चिनी अधिकाºयांनी नुकतेच हाँगकाँगमध्ये पकडले होते. चौकशीनंतर मंगळवारी रात्री उशिरा त्याला सोडून देण्यात आल्याचे समजते. चिनी अधिकाºयांकडून हाँगकाँगमध्ये जोरदार तपासणी मोहीम राबविली जात आहे.
याआधी जानेवारी २0१0 मध्ये गुजरातमधील २२ हिरे व्यावसायिकांस चीनच्या सीमा शुल्क अधिकाºयांनी अशाच आरोपांखाली अटक केली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर १३ जणांना परत आणण्यात आले होते.
सूत्रांनी सांगितले की, हाँगकाँगमधील एका कुरिअर संस्थेत काम करणाºया एका चिनी जोडप्यास १0 आॅगस्ट रोजी चीनच्या सीमा शुल्क अधिकाºयांनी अटक केली होती. त्यांच्याकडे तस्करीच्या हिºयांची १५0 पाकिटे सापडल्याचे समजते. हे हिरे चीनमधील शेनझेनला नेण्यात येणार होते. हे हिरे त्यांना कोणी दिले, तसेच ते कोणापर्यंत पोहोचवायचे आहेत, याची नावे असलेली एक डायरी चिनी अधिकाºयांना या जोडप्याकडे सापडली. या डायरीच्या आधारे १२0 लोकांना पकडण्यात आले. हे सर्व जण चिनी आहेत. त्यांना शेनझेनला नेण्यात आल्याची माहिती आहे.
चीनमध्ये हिºयांवर ४ टक्के सीमा शुल्क लागते. ते टाळण्यासाठी हाँगकाँगमधून चीनच्या मुख्य भूमीत मोठ्या प्रमाणात हिºयांची तस्करी होते. चीन हे हिरेजडित दागिन्यांच्या निर्मितीचे मोठे केंद्र आहे. त्यासाठी हिºयांची मोठी गरज लागते.
या पार्श्वभूमीवर हाँगकाँगमधील भारतीय हिरे व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी ‘रत्ने व आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदे’च्या गुजरात झोनने भारत सरकारकडे केली आहे. परिषदेचे चेअरमन दिनेश नवाडिया यांनी सांगितले की, हिरे व्यवसायाशी संबंधित १२0 जणांना चिनी अधिकाºयांनी पकडल्याचे समजते. एका गुजराती व्यावसायिकाचीही चौकशी करण्यात आली आहे. आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, सरकारने भारतीय दूतावासास सूचना देऊन भारतीय हिरे व्यावसायिकांना मदत करण्यास सांगावे.
सीमा शुल्क टाळण्यासाठी कुरिअर सेवेचा वापर
सूत्रांनी सांगितले की, अनेक भारतीय हिरे व्यावसायिकांचे उत्पादन प्रकल्प सुरतेत असून, व्यापारी कार्यालये हाँगकाँगमध्ये आहेत. हाँगकाँग हे मुक्त व्यापार क्षेत्र आहे. हाँगकाँगमधील हिरे व्यावसायिक संस्था सीमा शुल्क टाळण्यासाठी हिरे कुरिअर सेवेद्वारे शांघाय, शेनझेन अणि गुआंगझू येथे पाठवतात. यातील अनेक संस्था स्थानिकांच्या मदतीने भारतीयांद्वारेही चालविल्या जातात, अशी माहिती आहे.
आॅगस्टच्या
मध्यापासून हिºयांच्या पार्सलांवर नजर
हाँगकाँग, शेनझेन आणि गुआंगझूमध्ये व्यापार कार्यालय असलेल्या सुरतेतील एका व्यापाºयाने सांगितले की, आॅगस्टच्या मध्यापासून हिºयांच्या पार्सलांवर चिनी अधिकाºयांची नजर असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. बुधवारी त्यांनी छापेमारी सुरू केली.
तस्करीप्रकरणी हाँगकाँगमध्ये चिनी अधिकाऱ्यांचे छापे; भारतातील हिरे व्यावसायिकांत खळबळ!
स्थानिक जोडप्यास अटक,सुरत, मुंबईतील व्यावसायिक संस्थांची फोनाफोनी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:09 AM2020-09-04T05:09:40+5:302020-09-04T05:10:42+5:30