Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिटफंड कंपन्यांविरोधात तीन राज्यांमध्ये छापे

चिटफंड कंपन्यांविरोधात तीन राज्यांमध्ये छापे

कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी दक्षिण भारतातील तीन राज्यांत ८0 ठिकाणी छापे मारले

By admin | Published: April 20, 2017 01:02 AM2017-04-20T01:02:31+5:302017-04-20T01:02:46+5:30

कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी दक्षिण भारतातील तीन राज्यांत ८0 ठिकाणी छापे मारले

Raids in three states against chit fund companies | चिटफंड कंपन्यांविरोधात तीन राज्यांमध्ये छापे

चिटफंड कंपन्यांविरोधात तीन राज्यांमध्ये छापे

चेन्नई : कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी दक्षिण भारतातील तीन राज्यांत ८0 ठिकाणी छापे मारले. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील चिट फंड कंपन्या आणि त्यांच्या सहयोगींच्या विरोधात हे छापे घालण्यात आल्याचे समजते.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, चेन्नईतील अनेक ठिकाणी चिट फंड कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी संस्था आणि व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय तामिळनाडूतील ४३ ठिकाणी, केरळातील २९ ठिकाणी आणि कर्नाटकातील ६ ठिकाणी छापे मारण्यात आले. इतरही काही ठिकाणी छापे मारण्यात आले.

Web Title: Raids in three states against chit fund companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.