चेन्नई : कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी दक्षिण भारतातील तीन राज्यांत ८0 ठिकाणी छापे मारले. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील चिट फंड कंपन्या आणि त्यांच्या सहयोगींच्या विरोधात हे छापे घालण्यात आल्याचे समजते. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, चेन्नईतील अनेक ठिकाणी चिट फंड कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी संस्था आणि व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय तामिळनाडूतील ४३ ठिकाणी, केरळातील २९ ठिकाणी आणि कर्नाटकातील ६ ठिकाणी छापे मारण्यात आले. इतरही काही ठिकाणी छापे मारण्यात आले.
चिटफंड कंपन्यांविरोधात तीन राज्यांमध्ये छापे
By admin | Published: April 20, 2017 1:02 AM