शेअर बाजारात रेलटेलचा शेअर शुक्रवारी 3 टक्क्यांनी वधारून 219.85 रुपयांवर पोहोचला आहे. एका बातमीनंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. या कंपनीला अंदाजे 68 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेडसाठी इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी (ICCC) डेटा सेंटर आणि डिझास्टर रिकव्हरी सेंटरचे डिझाइन, पुरवठा, स्थापना, परीक्षण, कमिशनिंग, तसेच संचालन आणि देखभाल यांसाठी ही ऑर्डर मिळाली आहे. NSE वर RailTel चा शेअर 2 टक्क्यांनी वाढून Rs 219 वर ट्रेड करत होते.
700 कोटी रुपयांचे वर्क ऑर्डर -
याच वर्षाच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात कंपनीला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडून (पीसीएससीएल) 700 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली होती. याच महिन्यात रेलटेल कॉर्पोरेशनलाही भारतीय रेल्वेच्या नेक्स्ट जनरेशनच्या प्रवासी आरक्षण प्रणालीसाठी (पीआरएस) क्लाउड इंफ्रास्ट्रक्चरच्या खरेदीसाठी सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टिम्स (सीआरआयएस)कडून 78.58 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.
अशी आहे शेअर्सची स्थिती -
रेलटेलच्या शेअरने गेल्या एका वर्षात निफ्टी 50 पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. या काळात निफ्टीतील 13 टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत पीएसयू स्टॉकमध्ये 94 टक्क्यांची वाढ झाली आहे. YTD रेलटेलच्या शेअरची किंमत जवळपास 70 टक्क्यांनी वाढली आहे. तांत्रिक दृष्ट्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) 52.4 वर आहे, याचाच अर्थ हा शेअर ना ओव्हरबॉट आहे, ना ओव्हरसोल्ड स्थितीत व्यवहार करत आहे. या एका वर्षातील बिटा 1 आहे. जो सरासरी अस्थिरता दर्शवतो. ट्रेंडलाइन डेटाच्या तुलनेत हा स्टॉक आपल्या 20-दिवसांच्या सरासरी, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांची मूव्हिंग सरासरीपेक्षा वर व्यवहार करत आहे.