नवी दिल्ली - नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांच्या खिशावरील ओझे वाढणार आहे. आपल्याला लवकरच रेल्वेने प्रवास करण्यासाठी (Railway Journey) 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. खरे तर, रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway) एअरपोर्टच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन्सवर स्टेशन डेव्हलपमेंट फीस (Station Development Fee) घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना ही फीस यूजर चार्जच्या स्वरुपात द्यावी लागणार आहे.
10 ते 50 रुपयांच्या दरम्यान घेतला जाईल चार्ज -
एअरपोर्टच्या धर्तीवर तयार होत असलेल्या नव्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून युजर चार्जेस घेतले जाईल. ही फीस 10 ते 50 रुपयांपर्यंत असेल. रेल्वे देशभरात 400 रेल्वे स्थानके जागतिक दर्जाच्या सुविधांसह तयार करत आहे. यातील बहुतांश रेल्वे स्थानकांचे काम सरकारी-खासगी भागीदारीने सुरू आहे. गांधी नगर आणि भोपाळचे राणी कमलावती रेल्वे स्थानक सज्ज झाले असून पीएम मोदींनी त्याचे उद्घाटनही केले आहे.
रेल्वे बोर्डाचीही मंजुरी -
रेल्वे बोर्डाने प्रवाशांना युजर चार्जेस लावण्यास मान्यता दिली आहे. वेगवेगळ्या क्लासच्या प्रवाशांना वेगवेगळा चार्च लावला जाईल आणि त्याचा समावेश तिकिटातच असेल. रेल्वे मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, हा जार्च 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल.
एअरपोर्ट्सवर घेतला जातो यूजर चार्ज -
अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क 10 रुपये असेल आणि स्लीपरने प्रवास करणाऱ्यांना 25 रुपये तर एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांना 50 रुपये अतिरिक्त यूजर चार्ज आकारले जाईल. सध्या अशा प्रकारचे शुल्क केवळ देशातील विमानतळांवरच आकारले जाते. मात्र, रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे शुल्क केव्हापासून आकरले जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.
प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणाऱ्यांनाही सेवा शुल्काच्या स्वरुपात 10 रुपये द्यावे लागतील. विमानतळाप्रमाणे विकसित करण्यात आलेल्या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांनाही निश्चित किंमतीच्या ५० टक्के शुल्क आकारले जाईल.