Join us

Railway PSU ला Tata Group कडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्स वधारले; १ वर्षात ७०% रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 3:36 PM

Railway PSU Stocks: शेअर बाजारातील तेजीदरम्यान या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली आहे. टाटांच्या कंपनीकडून ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर रेल्वे पीएसयू स्टॉकमध्ये ही वाढ झाली.

Railway PSU Stocks: शेअर बाजारातील तेजीदरम्यान रेल्वे पीएसयू राइट्स लिमिटेडच्या (RITES Ltd) शेअरमध्ये मोठी तेजी आली आहे. व्यवहारादरम्यान बीएसईवर हा शेअर १.८१ टक्क्यांनी वधारून ६५८.४० च्या पातळीवर पोहोचला. ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर रेल्वे पीएसयू स्टॉकमध्ये ही वाढ झाली. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, रेल्वे पीएसयूला टाटा समूहाच्या कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ३५ टक्क्यांनी वधारलाय. 

काय आहे माहिती? (RITES Order Details) 

स्टॉक एक्स्चेंज बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, रेल्वे पीएसयू राइट्स लिमिटेडला टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील लिमिटेड कलिंगनगरकडून लोको हायरिंगसाठी लेटर ऑफ अॅवॉर्ड मिळाले आहे. त्याची किंमत ३९.६३ कोटी रुपये आहे. याअंतर्गत कंपनीला लोको हायरिंगसह ऑपरेशन आणि मेंटेनन्सचे काम मिळाले आहे. हा आदेश २० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करायचा आहे. 

राइट्स शेअर परफॉर्मन्स 

शेअरच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर एका आठवड्यात त्यात ७ टक्के आणि दोन आठवड्यांत ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र या शेअरने २०२४ मध्ये ३० टक्के आणि ६ महिन्यांत ३५ टक्के परतावा दिलाय. गेल्या वर्षभरात या शेअरचा परतावा ७० टक्के आणि गेल्या २ वर्षांत १४६ टक्के आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजारसरकार