Railway PSU Stock : आज(दि.9) शेअर बाजाराच्या बंद होताच मल्टीबॅगर रेल्वे PSU Rail Vikas Nigam Ltd ला आनंदाची बातमी मिळाली आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, रेल्वे PSU RVNL ला दक्षिण पूर्व रेल्वेसाठी सर्वात कमी बोलीदार (L1) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या रेल्वे PSU ला सातत्याने ऑर्डर्स मिळत आहेत. दरम्यान, या मल्टीबॅगर शेअरने गेल्या काही महिन्यांत शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत.
बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, रेल्वे PSU RVNL ला दक्षिण पूर्व रेल्वेकडून सर्वात कमी बोलीदार (L1) घोषित करण्यात आले आहे. याअंतर्गत दक्षिण पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागातील खरगपूर-भद्रक विभागात 3 हजार मेट्रिक टन लोडिंगचे काम केले जाणार आहे. या ऑर्डरचे मूल्य 202,87,57,512.14 (रु. 202.87 कोटी) आहे. हे काम 18 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.
RVNL शेअरची माहिती
आपण या मल्टीबॅगर रेल्वे पीएसयूच्या स्टॉक कामगिरीवर नजर टाकली, तर त्याने गेल्या 3 महिन्यांत 107 टक्के आणि गेल्या 6 महिन्यांत 193 टक्के मजबूत परतावा दिला आहे. 2024 मध्ये स्टॉक 198 टक्क्यांनी वाढला आहे. तर, गेल्या एका वर्षात हा 345 टक्के आणि गेल्या दोन वर्षांत 1652 टक्क्यांनी वाढला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 620 आहे, तर 52 आठवड्यांचा निच्चांक 117.35 आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 1,13,247.87 कोटी आहे.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)