Railway PSU Stock : उद्या, म्हणजेच 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पुर्वी, आज बाजार बंद होताच रेल्वे PSU, RailTel Corporation of India Limited (RailTel) ला एक मोठी बातमी मिळाली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सरकारी रेल्वे कंपनीने सांगितले की, त्यांना रेल्वे मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत 1,86,81,00,000 रुपये आहे. दरम्यान, आज या रेल्वे पीएसयूचा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 527 रुपयांवर बंद झाला. हा एक मल्टीबॅगर स्टॉक असून, याने एका वर्षात भागधारकांना 237 % परतावा दिला आहे.
RailTel ऑर्डर डिटेल्सRailTel Corporation of India Limited (RailTel) ला HMIS आणि भारतीय रेल्वेसाठी इंटिग्रेटेड एम्पॅनल्ड हॉस्पिटल रेफरल पोर्टलचे डिझाइन, डेव्हलपमेंट, ऑपरेशन आणि देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाने कंत्राट दिले आहे. ही वर्क ऑर्ड 1,86,81,00,000 रुपयांची असून, यासाठी 4 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
RailTel शेअर इतिहासआपण RailTel स्टॉकच्या कामगिरीवर नजर टाकली तर, स्टॉकने गेल्या 3 महिन्यांत 38 टक्के, 6 महिन्यांत 18 टक्के आणि 2024 मध्ये आतापर्यंत 48 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या एका वर्षात हा स्टॉक 237 टक्के आणि दोन वर्षांत 440 टक्के वाढला आहे. रेल्वे PSU स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 618 आहे आणि निच्चांक 142.70 आहे. या मिनीरत्न कंपनीचे मार्केट कॅप 16,913.45 कोटी रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)