Lokmat Money > बिझनेस न्यूज > मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रेल्वेच्या RVNL आणि IRFC यांच्या शेअर्सनं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:26 PM2024-02-12T15:26:03+5:302024-02-12T15:26:24+5:30

रेल्वेच्या RVNL आणि IRFC यांच्या शेअर्सनं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येतेय.

Railway stocks rvnl irfc huge profit in few months now investors selling shares down | मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Railway Stocks: रेल्वेच्या RVNL आणि IRFC यांच्या शेअर्सनं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येतेय. या दोन्ही शेअर्सचे डबे आता आता रुळावरून घसरले आहेत. आज रेल्वे विकास निगम म्हणजेच RVNL चे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरून 237.30 रुपयांवर आले होते. दुसरीकडे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड देखील सुमारे 10 टक्क्यांनी घसरून 138.60 रुपयांवर आला आहे.
 

आरवीएनएलचा शेअर गेल्या 5 दिवसात 13 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर, आयआरएफसीचा शेअर 11 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. जर आपण या वर्षाच्या कामगिरीबद्दल बोललो तर, ही घसरण असूनही, आयआरएफसीनं सुमारे 39 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, आरवीएनएल 30 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आरवीएनएलचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 345.50 रुपये आणि नीचांकी स्तर 56.05 रुपये आहे. आयआरएफसीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 192.80 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 25.40 रुपये आहे.
 

आयआरएफसी शेअर प्राईज हिस्ट्री
 

IRFC च्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या शेअरनं केवळ तीन वर्षांत 456 टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. गेल्या एका वर्षात त्यात 360 टक्क्यांनी वाढ झालीये.
 

आरवीएनएल शेअर प्राईज हिस्ट्री
 

आरवीएनएलनं देखील आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. एका वर्षात 239 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत त्यात 1089 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 

का होतेय घसरण?
 

रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत त्यांच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात 4% घट नोंदवली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 326 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. गेल्या वर्षी या कालावधीत कंपनीची 341 कोटी रुपयांची कमाई झाली होती. दुसरीकडे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) निव्वळ नफ्यात डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात 1.7 टक्क्यांची घसरण होऊन तो 1,604 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 1,633 कोटी होता.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Railway stocks rvnl irfc huge profit in few months now investors selling shares down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.