Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

यूटीएस ॲपमध्ये करण्यात आलेत फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:56 AM2023-12-07T09:56:59+5:302023-12-07T09:57:18+5:30

यूटीएस ॲपमध्ये करण्यात आलेत फेरबदल

railway ticketing app UTS preferred by 14 76 crore passengers revenue of 161 75 crores in 7 months | ‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

मुंबई : यूटीएस मोबाइल ॲपमध्ये बदल करण्यात आले असून, मध्य रेल्वेच्या ५ विभागात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान १४.७६ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल ॲपचा वापर केला. त्यातून  १६१.७५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. मुंबई विभागात १४.४४ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल ॲप वापरले. त्यातून १५५.८६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर पूर्वी स्रोत स्थानकापासून यूटीएस तिकीट बुक करण्याची बाह्य मर्यादा उपनगरीय स्थानकांसाठी ५ किमी आणि गैर-उपनगरी स्थानकासाठी २० किमी होती, आता ती अनुक्रमे २० किमी आणि ५० किमी करण्यात आली आहे.

मार्चपासून यूटीएस ॲपमध्ये किमान ५० रुपयांचे ऑनलाइन मोडद्वारे रिचार्जचे बदल केले  आहेत. हँडसेट बदलण्याची विनंती करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. परिणामी रेल्वेवरील तक्रारी कमी झाल्या आहेत. वैध प्रवास / सीझन तिकीट असेल तरी आता हँडसेट बदलाच्या विनंतीवर प्रक्रिया करता येते. जर वापरकर्त्याने जाणूनबुजून हँडसेट बदलण्याची निवड केली, तर ॲपला तिकीट सिंक होण्यासाठी एक तास लागेल.

  • एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान मध्य रेल्वेच्या ॲपचा १४.७६ कोटी प्रवाशांनी  वापर केला. 
  • एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १४.४४ कोटी प्रवाशांनी ॲपचा वापर केला. 
  • ॲप हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेतही उपलब्ध आहे. 
  • चुकीच्या पासवर्डमुळे ॲप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आली आहे. 
  • यूटीएस ॲप आणि पेमेंट ॲपदरम्यान टॉगल न करता थेट यूपीआय मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय प्रदान करून पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

Web Title: railway ticketing app UTS preferred by 14 76 crore passengers revenue of 161 75 crores in 7 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे