Join us  

आता फक्त प्रवासच नाही तर 'ही' विशेष सेवाही रेल्वे पुरवणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 4:12 PM

Railway : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)  यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रेल्वे आता पार्सलच्या क्षेत्रातही हात आजमावणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे (Indian Railway) आता देशभरात घरोघरी म्हणजेच डोअर-टू-डोअर पार्सल पोहोचवण्याची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)  यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रेल्वे आता पार्सलच्या क्षेत्रातही हात आजमावणार आहे. यामुळे पार्सल क्षेत्रालाही गती मिळेल. दरम्यान, पायलट प्रोजेक्टला सुरुवात करण्यात आली आहे.

भारतीय पोस्ट  (India Post) आणि भारतीय रेल्वेचे एक 'जॉइंट पार्सल प्रॉडक्ट' (JPP) विकसित केले जात आहे, ज्यामध्ये टपाल विभागामार्फत फर्स्ट-माईल आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल आणि स्टेशन ते स्टेशनपर्यंत इंटरमीडिएट कनेक्टिव्हिटी रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येईल. संपूर्ण पार्सल हाताळणी समाधान प्रदान करून व्यवसाय-ते-व्यवसाय आणि व्यवसाय-ते-ग्राहक बाजारपेठेला लक्ष्य करण्याचे जेपीपीचे उद्दिष्ट आहे, याचा अर्थ असा आहे की जो कोण पार्सल पाठवणार त्यांच्या परिसरातून पार्सल उचलणे, प्राप्तकर्त्याकडे बुकिंग करणे आणि घरोघरी वितरण करणे ही जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे. 

पायलट प्रोजेक्ट सुरूभारतीय रेल्वे आणि इंडिया पोस्टद्वारे पायलट प्रोजेक्टच्या आधारावर 'जॉइंट पार्सल प्रॉडक्ट' सुरू करण्यात आले आहे. पायलट प्रोजेक्टची पहिली सेवा सुरत ते वाराणसी 31 मार्च 2022 रोजी सुरू झाली आहे.

अनेक सेवांचा समावेश असेलरेल्वेच्या माध्यमातून एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनच्या दरम्यान संपर्क राहील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. संपूर्ण पार्सल सेवा देऊन व्यवसाय ते व्यवसाय आणि व्यवसाय ते ग्राहक संपर्क प्रस्थापित करणे हे जेपीपीचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या अंतर्गत पार्सल पाठवणाऱ्याच्या परिसरातून पार्सल उचलणे, बुकिंग करणे आणि नंतर ते इच्छित स्थळी पोहोचवणे या सेवेचा समावेश करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

टॅग्स :रेल्वेभारतीय रेल्वे