Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा

Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा

Indian Railways: कोरोना संक्रमणादरम्यान बंद झालेली खास सर्व्हिस आता पुन्हा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:39 AM2021-11-25T08:39:56+5:302021-11-25T08:40:47+5:30

Indian Railways: कोरोना संक्रमणादरम्यान बंद झालेली खास सर्व्हिस आता पुन्हा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

Railways to resume catering services in these trains. Full list | Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा

Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा

 नवी दिल्ली : Indian Railways Latest News: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा प्रवास अधिक आनंददायी होणार आहे. दरम्यान, कोरोना संक्रमणादरम्यान बंद झालेली खास सर्व्हिस आता पुन्हा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

विशेष म्हणजे, कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि ट्रेनचे संचालनही बंद करण्यात आले होते. यानंतर कोरोनाची परिस्थिती सुधारत गेली आणि पुन्हा ट्रेन रुळांवर येऊ लागल्या. मात्र, कोरोनाचे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी ट्रेनमधील अनेक सेवा पूर्णपणे बंद आहेत.

पुन्हा मिळणार शिजवलेले अन्न
आता प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रेल्वेने (Railway)पुन्हा ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न (Cooked Food) देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाने परिपत्रक जारी करून दिली आहे. त्यानुसार, लवकरच रेल्वे पुन्हा ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण (Cooked Meals) देण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, रेडी टू इट (Ready-to-Eat) जेवणही मिळेल.

या गाड्यांमध्ये मिळेल सुविधा 
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सध्या सर्व ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सुविधा दिली जाणार नाही. सध्या राजधानी, दुरांतो, शताब्दी, तेजस, गतिमान एक्स्प्रेस या गाड्यांमध्येच केटरिंग सेवा उपलब्ध असेल, ज्याअंतर्गत ताजे शिजवलेले जेवण ट्रेनमध्येच प्रवाशांना दिले जाईल. पण, हळूहळू ही सुविधा इतर गाड्यांमध्येही उपलब्ध होणार आहे.

विभागाकडून परिपत्रक
जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सामान्य रेल्वे सेवा पुनर्संचयित करणे, प्रवासी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आणि देशभरातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि अशा इतर ठिकाणी कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, हे पाहता रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, रेडी टू इट सर्व्हिसही सुरू राहणार आहे.
 

Web Title: Railways to resume catering services in these trains. Full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.