नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाच्या संचालनाच्या खर्चातही प्रचंड वाढ झाल्याबद्दल भारताचे नियंत्रक व लेखापाल (सीएजी-कॅग) च्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वेचा संचलनाचा खर्च ९८.४४ टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच रेल्वेला जेव्हा १00
रुपये मिळवतात, त्यातील ९८ रुपये ४४ पैसे इतकी रक्कम संचालनावर खर्च होतात. गेल्या दहा वर्षांतील ही वाईट स्थिती असल्याचे कॅगने म्हटले आहे.
महसुलातून येणाऱ्या रकमेतील इतका वाटा संचलनावरच होणे याचा अर्थ रेल्वे किती क्षमतेने काम करते आणि तिची आर्थिक स्थिती किती नाजुक आहे, हेच या कॅगच्या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. आलेल्या रकमेतील केवळ १.६६ पैसेच रेल्वेकडे शिल्लक राहतात, असा याचा अर्थ होतो.
या परिस्थितीमुळे रेल्वेकडे ५६७६.२९ कोटी इतकी नकारात्मक शिल्लक राहिली असती. पण एनटीपीसी व इंडियन रेल्वे
कॉर्पोरेशन यांच्याकडून मिळालेल्या आगाऊ रकमेमुळे १६६५.६१ कोटी शिल्लक दिसत आहे, असेही कॅगने म्हटले आहे.
६६% महसूल घटला
देशात आर्थिक मंदीचे वातावरण असतानाच, आता नेट रेव्हेन्यू सरप्लसमध्येही (निव्वळ अतिरिक्त महसूल)घट झाली असल्याचे भारताचे नियंत्रक व महालेखापाल (सीएजी-कॅग) यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
ही घट तब्बल ६६.१0 टक्के
आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कॅगच्या ताज्या अहवालानुसार २0१६-१७ या आर्थिक वर्षांत भारताचा निव्वळ अतिरिक्त
महसूल ४९१३ कोटी रुपये इतका होता.
रेल्वेचे १00 मधील ९८.४४ रुपये संचलनावरच खर्च, कॅगच्या अहवालात चिंता
गेल्या दहा वर्षांतील ही वाईट स्थिती असल्याचे कॅगने म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:20 AM2019-12-03T04:20:58+5:302019-12-03T04:25:01+5:30