Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे पूर्ववत सवलत देणार, वयाचे निकष बदलणार

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे पूर्ववत सवलत देणार, वयाचे निकष बदलणार

वयाचे निकष बदलणार : प्रवास भाडे सवलत सामान्य आणि शयनयान श्रेणींसाठीच देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:02 PM2022-07-28T12:02:38+5:302022-07-28T12:03:19+5:30

वयाचे निकष बदलणार : प्रवास भाडे सवलत सामान्य आणि शयनयान श्रेणींसाठीच देणार

Railways will provide retroactive discount to senior citizens | ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे पूर्ववत सवलत देणार, वयाचे निकष बदलणार

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे पूर्ववत सवलत देणार, वयाचे निकष बदलणार

नवी दिल्ली : चौफेर टीका झाल्यानंतर रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्याचा विचार करत आहे. या सवलती फक्त सामान्य आणि शयनयान श्रेणीसाठी असतील, असे सूत्रांनी सांगितले. वयाच्या निकषांत बदल करुन प्रवास भाडे सवलत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. आधी ही वयोमर्यादा महिलांसाठी ५८ वर्षे आणि  पुरुषांसाठी ६० वर्षे होती. सूत्रांनी संकेत दिलेत की, यामागचे मुख्य कारण ज्येष्ठांसाठी  सबसिडी कायम राखत या सवलतीमुळे रेल्वेवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचे समायोजन करणे होय. या सवलतींमुळे ज्येष्ठांना मदत होते, हे आम्ही समजून आहोत. सवलती पूर्णत: रद्द केल्या जातील, असे आम्ही कधीही म्हटलेले नव्हते. याबाबत आम्ही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे  एका सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी संकेत दिले आहेत की, रेल्वे मंडळ ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठी वयासंबंधीच्या निकषांत  बदल करण्याचा आणि या सवलती फक्त ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रेल्वेचे दायित्व मर्यादित होईल, असेही त्यांनी सांगितले.
२०२० मध्ये कोरोना साथीदरम्यान मागे घेण्यासाठी वरिष्ठ नागरिक सवलत ५८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या महिला आणि ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांसाठी होती. महिला ५० टक्के सवलतींसाठी पात्र होत्या. पुरुष आणि विपरित लिंगी सर्व श्रेणीत ४० टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकत होते. रेल्वे आणखी एका तरतुदीवर विचार करत आहे. ती तरतूद अशी की, सवलती फक्त बिगर-वातानुलिकरण श्रेणीच्या प्रवासापुरतीच मर्यादित करणे होय.

सर्व ट्रेनमध्ये प्रीमियम तत्काळ योजना सुरू करण्याच्या पर्यायावरही रेल्वे विचार करत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यास मदत मिळेल. त्यामुळे सवलतींचा बोजा उचलण्यास उपयोगी होऊ शकतो. ही योजना सध्या ८० ट्रेनमध्ये आहे. प्रीमियम तत्काळ योजनेत काही आसने मागणीनुसार मूल्य निर्धारित करून आरक्षित केली जातात. हा कोटा शेवटच्या क्षणी प्रवासाची योजना करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांसाठी आहे, ज्यांची थोडा अतिरिक्त खर्च करण्याची तयारी असते. प्रीमियम तत्काळ भाड्यात मूळ प्रवासभाडे आणि अतिरिक्त तत्काळ शुल्काचा समावेश असतो. परिणामी जुलै २०१६ मध्ये रेल्वे ज्येष्ठांसाठी सवलती ऐच्छिक केल्या होत्या. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या ५० हून अधिक प्रकारच्या सवलतींमुळे रेल्वेवर दरवर्षी २,००० कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागरिक सवलत एकूण सवलतीपेक्षा जवळपास ८० टक्के असते. यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु, तो यशस्वी झाला नाही. 

Web Title: Railways will provide retroactive discount to senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.