Join us

बजेटपूर्वीच अदानी-अंबानींवर पैशांचा पाऊस, एकाच दिवसांत कमावला एवढा सारा पैसा; तुम्ही अंदाजही लाऊ शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:50 AM

Budget 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सोमवारी 2,905 रुपयांच्या पातळीला स्पर्ष केला. ही याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

भारतीय शेअर बाजारात सोमवारी अंबानींची कंपनी रिलायन्स आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तुफान तेजीमुळे या दोन्ही अब्जाधीशांनी एकाच दिवसात 11 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची कमाई केली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सोमवारी मुकेश अंबानींची संपत्ती 6.86 बिलियन डॉलरने वाढून 108 बिलियन डॉलरवर पोहोचली. तर अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी 4.28 अब्ज डॉलरची भर पडली. आता त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सोमवारी 2,905 रुपयांच्या पातळीला स्पर्ष केला. ही याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. आरआयएल 183.95 (6.80%) रुपयांच्या वाढीसह 2,890.10 रुपयांवर बंद झाला. या वाढीनंतर, कंपनीचे मार्केट कॅप आता 19.55 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसऱ्या बाजूलला अदानींच्या कंपन्यांचे शेअरही वाढीसह बंद झाले. अडानी एंटरप्राइजेसचा शेअर 5.79% च्या वाढीसह बंद झाला.

एलन मस्क यांनाही मोठा फायदा -यातच, टेस्लाच्या शेअरनेही 4.2% ची उसळी घेतली आहे. एलन मस्क यांची संपत्ती सोमवारी 5.49 अब्ज डॉलरने वाढून 204 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत जेफ बेजोस त्यांची संपत्ती 2.14 अब्ज डॉलरने वाढून 186 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांच्याकडे 183 अब्ज डॉलर एवडी संपत्ती आहे. ते ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत मुकेश अंबानी 108 अब्ज नेटवर्थसह 11व्या आणि अदानी 95.9 अब्ज डॉलरसह 14व्या पोझिशनवर आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीगौतम अदानीएलन रीव्ह मस्क