नवी दिल्ली - देशातील यंदाचे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या २७.९५ कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होऊ शकते. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले की, मान्सूनचे दमदार आगमन, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत चांगले राहू शकते.
कृषी सचिव पटनायक म्हणाल्या की, आगामी आठवड्यात पेरणीची गती वाढेल. काही भागांत सद्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी पाऊस चांगला राहील, असा अंदाज आहे.
सरकारने गत आठवड्यात १४ खरीप शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकरी पेरण्यांसाठी उत्साहित राहणार आहेत. तथापि, देशाच्या काही भागांत पाऊस कमी असल्याने खरिपांच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. खरिपाची पेरणी जूनच्या सुरुवातीपासून सुरू होते, तर आॅक्टोबरमध्ये पिकांची काढणी सुरू होते.
पटनायक यांनी सांगितले की, ज्या भागात पेरणी झाली नाही, त्याची भरपाई आगामी आठवड्यात होईल. आम्ही निश्चित मागील वर्षीच्या उत्पादन स्तरापेक्षा पुढे जाऊ.
मोठ्या धान्याचे पेरणी क्षेत्र १३.४५ टक्के घटून ५७.३५ लाख हेक्टर इतके आहे. मागील वर्षी हे क्षेत्र ६६.२७ लाख हेक्टर होते. तेलबियांचे क्षेत्र १३.४२ टक्के घटून
७३.४५ लाखांहून ६३.५९ हेक्टर इतके आहे. नगदी पिकांमध्ये कापसाचे पेरणी क्षेत्र २४ टक्के कमी होऊन म्हणजेच ५४.६० लाख हेक्टर होते. एक वर्षांपूर्वी याच काळात ते ७१.८२ लाख हेक्टर होते.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील आठवड्यापर्यंत सर्व खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र ३३३.७६ लाख हेक्टर होते.
मागील वर्षी याच काळात ३८८.८९ लाख हेक्टर एवढे पेरणी क्षेत्र होते. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र १४.१७ टक्के कमी आहे.
तांदूळ लागवडीखालील जमीन १५ टक्के कमी होऊन ६७.२५ लाख हेक्टर झाली आहे. मागील वर्षी याच काळात हे क्षेत्र ७९.०८ लाख हेक्टर होते.
डाळींचे पेरणी क्षेत्र २० टक्के घटून ३३.६० लाख हेक्टर झाले आहे. मागील वर्षी हे क्षेत्र ४१.६७ लाख हेक्टर होते. ही आकडेवारी मागील आठवड्यातील आहे.
वरुणराजा कृपा करणार
अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या27.95कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११ जुलैपर्यंत दक्षिण भारतात पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा चांगला राहण्याची शक्यता आहे, तर देशाच्या उर्वरित भागात पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, देशाच्या बहुतांश भागात पाऊस जोर पकडू शकतो.
पाऊस चांगला राहणार : अन्नधान्य उत्पादन वाढणार
देशातील यंदाचे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या २७.९५ कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होऊ शकते. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले की, मान्सूनचे दमदार आगमन, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत चांगले राहू शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:13 AM2018-07-09T05:13:53+5:302018-07-09T05:14:15+5:30