नवी दिल्ली : कॉलड्रॉप रोखण्यासाठी आणखी मोबाईल टॉवर उभारा, तसेच २ जी नेटवर्क मजबूत करा, असे आदेश दूरसंचार नियामक ट्रायने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.
कॉलड्रॉपवरील तांत्रिक दस्तावेजात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) म्हटले की, मोबाईल टॉवरांच्या संख्येत तात्काळ वाढ करण्याची गरज आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी टॉवरांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. काही क्षेत्रांतील मोबाईल टॉवर हटविण्याच्या मुद्यावरही समाधानकारक तोडगा काढायला हवा. शहरी भागात कॉलड्रॉपची समस्या अधिक तीव्र आहे. विशेषत: ३जी नेटवर्कमध्ये वाढ झाल्यानंतर २जी नेटवर्क असलेल्या मोबाईल टॉवरांचा वृद्धीदर घटला आहे.
कॉलड्रॉप रोखण्यासाठी टॉवर उभारा
कॉलड्रॉप रोखण्यासाठी आणखी मोबाईल टॉवर उभारा, तसेच २ जी नेटवर्क मजबूत करा, असे आदेश दूरसंचार नियामक ट्रायने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.
By admin | Published: November 11, 2015 11:20 PM2015-11-11T23:20:32+5:302015-11-11T23:20:32+5:30