राज कुंद्रा (Raj Kundra) आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असेल्ल्या राज कुंद्रा, तसंच त्याची पत्नी शिल्पा शेट्टीवर आता इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप करण्यात आला आहे. तसंचया प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची कंपनी वियान इंडस्ट्रीड लिमिटेडवर खुलास्यांमधील कमतरता आणि त्यासोबत इन्सायड ट्रेडिंगच्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ३ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.
SEBI कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर एकूण ३ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच संयुक्तरित्या त्यांना याची भरपाई करावी लागणाक आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे वियान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत. नियामकाचा हा आदेश सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलेल्या तपासानंतर घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
ऑक्टोबर २०१५ मगद्ये वियान इंडस्ट्रीजनं चार लोकांना ५ लाख शेअर्सचं वाटप केलं होतं. याशिवाय राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला २.५७ कोटी रूपयांच्या (प्रत्येकी) १,२८,८०० (प्रत्येकी) शेअर्सचं वाटप करण्यात आलं. यासंदर्भात कंपनीला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. कारण देवाणघेवाणीचं मूल्यहे १० लाख रूपयांपेक्षा अधिक होतं. नियमांअतर्गत याचा खुलासा तीव वर्षांपेक्षा अधिक विलंबानं करण्यात आल्याचं रेकॉर्डवर असल्याचं सेबीनं म्हटलं.