Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 30 पैशांच्या शेअरची कमाल, एका वर्षांत 1 लाखाचे केले 37 लाख; 3 वर्षांत 2.2 कोटींचा परतावा

फक्त 30 पैशांच्या शेअरची कमाल, एका वर्षांत 1 लाखाचे केले 37 लाख; 3 वर्षांत 2.2 कोटींचा परतावा

एक वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत केवळ 30 पैसे एवढी होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 09:11 PM2022-08-10T21:11:45+5:302022-08-10T21:12:24+5:30

एक वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत केवळ 30 पैसे एवढी होती...

Raj rayon 30 paise penny stock made rs 1 lakh into 37 lakh in one year | फक्त 30 पैशांच्या शेअरची कमाल, एका वर्षांत 1 लाखाचे केले 37 लाख; 3 वर्षांत 2.2 कोटींचा परतावा

फक्त 30 पैशांच्या शेअरची कमाल, एका वर्षांत 1 लाखाचे केले 37 लाख; 3 वर्षांत 2.2 कोटींचा परतावा

जोखीम असलेले पेनी स्टॉक्स एखाद्या व्यक्तीला लखपतीपासून कोट्यधीशही बनवू शकतात. पण हेच स्टॉक्स आपली संपूर्ण रक्कमही बुडवू शकतात. अशाच एक 30 पैशांपर्यंत आलेल्या राज रेयॉनच्या शेअरने एका वर्षात तब्बल 3600 टक्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. हा शेअर सोमवारी एनएसईवर 11.10 रुपयांवर बंद झाला. 

एक वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत केवळ 30 पैसे एवढी होती. म्हणजेच, गेल्या एक वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी यात 30 पैशांनुसार, 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि आपली गुंतवणूक आजपर्यंत तशीच ठेवली, आज त्याचे तब्बल 37 लाख रुपये झाले असतील.

राज रेयॉनच्या शेअर प्राइस हिस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या कालावधीत या शेअरने 22100 टक्क्यांची उसळी घेतली आहे. अर्थात या शेअरने तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयांचे तब्बल 2.2 कोटी रुपये केले आहेत. तसेच या शेअरने केवळ 3 महिन्यांत 128.87 टक्के एवढा परतावा दिला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Raj rayon 30 paise penny stock made rs 1 lakh into 37 lakh in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.