आज आम्ही आपल्याला एका जबरदस्त शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत. या शेअरने वर्षभरात आपल्या ग्राहकांना तब्बल 5,290 टक्के एवढा परतावा दिला आहे. या शेअरचे नाव आहे, राज रेयॉन इंडस्ट्रीज लि (Raj Rayon Industries Ltd) या कंपनीचा शेअर शुक्रवारी बीएसईवर साधारणपणे 5 टक्क्यांच्या तेजीसह 11.86 रुपयांवर पोहोचून बंद झाला.
राज रेयॉन इंडस्ट्रीज शेअरची प्राईस हिस्ट्री -
राज रेयॉन इंडस्ट्रीजचा शेअर एक वर्षापूर्वी, म्हणजेच 24 मे 2021 रोजी बीएसईवर 22 पैशांना होता. जो आता 11.64 रुपयांनी वाढून 11.86 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5,290.91 टक्के एवढा परतावा दिला आहे. तर याच वर्षी YTD मध्ये या शेअरने 778.52 टक्यांचा परतावा दिला आहे. यादरम्यान हा शेअर 1.35 रुपयांनी वाढून 11.86 रुपये झाला. तर गेल्या एक महिन्यात हा शेअर 4.77 रुपयांनी वाढून 11.86 रुपयांवर पोहोचला. या महिन्यात याने तब्बल 149.16 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरने 21.27 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
गुंतवणूकदारांना मिळाला बम्पर नफा -
राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर प्राईस चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या एक लाख रुपयाचे तब्बल 53.90 लाख रुपये झाले असते. तर, एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याचे 8.78 लाख रुपये झाले असते.