चेन्नई : बँकांची बुडीत खात्यात पडलेली १00 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्तीच्या वसुलीसाठी ठोस पावले उचणारे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त गव्हर्नर रघुराम राजन यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तोंडभरून स्तुती केली. बँकिंग क्षेत्राची सफाई करण्यासाठी राजन यांनी अनेक उपाययोजना केल्याचे त्यांनी नमूद केले.
करुर वैश्य बँकेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित समरंभात मुखर्जी म्हणाले की, ‘अनुत्पादक मालमत्ता अथवा बुडीत कर्जे (एनपीए) ही बँकांपुढील मोठी समस्या आहे, ही चिंतेची बाब आहे. त्याविरुद्ध राजन यांनी धडक कार्यक्रम राबविला. शेड्युल्ड व्यावसायिक बँकांचा एनपीए मार्च २0१५ मध्ये १0.९0 टक्के होता. तो मार्च २0१६ मध्ये ११.४0 टक्के झाला. एनपीएसाठी करावी लागणारी तरतूदही ७३,८८७ कोटींवरून १,७0,६३0 कोटी झाली. याच काळात बँकांचा नफा ७९,४६५ कोटींवरून ३२,२८५ कोटींवर घसरला.’
एनपीए बँका दाखवित नव्हत्या. राजन यांनी एनपीए अधिकृतरीत्या जाहीर करण्यास भाग पाडले. त्यामुळे बँकांची खरी स्थिती समोर आली. मुखर्जी म्हणाले की, ‘जगाची अर्थव्यवस्था मंदीत असताना भारतीय अर्थव्यवस्था व बँकिंग व्यवस्था उत्तम कामगिरी करीत होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक जागतिक अर्थव्यवस्थेचा वारंवार आढावा आणि फेरआढावा घेत होत्या. बड्या-बड्या बँका बुडत होत्या. तेव्हा भारतीय बँका मजबुतीने काम करीत होत्या. पाया मजबूत असल्यामुळे हे घडू शकले.’ (वृत्तसंस्था)
वस्तू व सेवाकर विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले. त्यामुळे सरकार आता लवकरात लवकर जीएसटी कौन्सिल स्थापन करील, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. त्यांनी पुढे म्हटले की, जीएसटीमुळे २ निखर्व मूल्याची भारतीय अर्थव्यवस्था, तसेच १.३ अब्ज ग्राहक एकच एक बाजारात रूपांतरित होतील. गेल्या दीड दशकापासून हा कायदा व्हावा, यासाठी भारत प्रयत्नशील होता.
राजन यांनी ‘बँकिंग’ची साफसफाईच केली!
बँकांची बुडीत खात्यात पडलेली १00 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्तीच्या वसुलीसाठी ठोस पावले उचणारे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त गव्हर्नर रघुराम राजन यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
By admin | Published: September 12, 2016 01:12 AM2016-09-12T01:12:24+5:302016-09-12T01:12:24+5:30