जालना : चीनमध्ये आर्थिक मंदीची लाट आल्यामुळे चीनमध्ये उत्पादित होणारे स्टील भारतामध्ये साठवून येथे स्पर्धा निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्याचा परिणाम भारतीय स्टील उद्योगांवर होत आहे. यामुळे येथील स्टील उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसून बेरोजगारीसोबत भारतीय चलन परदेशात जात आहे, यासह काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
ऊर्जेची बचत व्हावी, तसेच प्रदूषण कमी होण्यासाठी राजुरी स्टीलने प्रयत्न केला आहे. भट्टीतून निघणारा १२५० अंश सेल्सिअस तापमानाचा बिलेटस् थंड न करताच त्यापासून सळयांची निर्मिती केली जात आहे. यामुळे ऊर्जेची मोठी बचत होत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. उच्च तापमानाच्या भट्टीमधून सळयानिर्मिती करणाऱ्या बिलेटस्ला पूर्वी काही तास थंड करावे लागे. या प्रक्रियेत कितीतरी ऊर्जा खर्ची होत असे.
राजुरी स्टीलने बिलेटस् थंड न करताच थेट त्यातून वेगवेगळ्या आकाराच्या सळयांची निर्मिती करीत आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्या लाखो टन कोळशाचीही बचत होत आहे. निर्मिती प्रक्रियेत प्रतिटन हजार ते दीड हजार रुपयांची बचत झाल्याने ग्राहकांना परवडेल अशा दरांत सळया मिळत आहेत. चीनमधील येणाऱ्या सळयांना देशी सळयांनी मोठी स्पर्धा देण्यात यश मिळविले आहे. देशातील इतर स्टील कारखान्यांनी याचा अवलंब केला, तर काही करीत आहेत. राजुरी स्टीलची सळई फक्त बिलेटस्पासूनच तयार होते, तसेच राजुरी समूहाचा बिलेटस् तयार करण्याचा स्वतंत्र कारखाना आहे. त्यातूनच दर्जेदार सळया तयार केल्या जातात.
इंगटपेक्षा बिलेटस्पासून तयार केलेल्या सळईची गुणवत्ता दर्जेदार असते. राजुरी स्टील १९९१ पासून स्टील उत्पादन व्यवसायात आहे. बांधकामासाठी लागणारी उत्तम दर्जाची सळई यात प्रामुख्याने टीएमटी बार, थर्मेक्स, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो स्टीलची सुद्धा निर्मिती करण्यात येते. ऊर्जेची बचत, प्रदूषण कमी व जास्त दर्जेदार स्टील उत्पादन करण्याचे काम कंपनी करीत आहे.
राजुरी स्टीलने सामाजिक बांधिलकी म्हणून स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाव’ हे अभियान राबविले. महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये मुलींची संख्या घटली आहे त्या ठिकाणी जाऊन प्रबोधनाचे काम केले. यात पथनाट्य, प्रदर्शन, माहिती पत्रके आदी माध्यमांतून मोठी जनजागृती केली आहे.
‘राजुरी स्टील’ने केली ऊर्जेची बचत
चीनमध्ये आर्थिक मंदीची लाट आल्यामुळे चीनमध्ये उत्पादित होणारे स्टील भारतामध्ये साठवून येथे स्पर्धा निर्माण करण्याचे काम करीत आहे.
By admin | Published: February 1, 2016 02:24 AM2016-02-01T02:24:40+5:302016-02-01T02:24:40+5:30