शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची सुरूवात केली होती. आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण १०० डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स १५० अकांवर होता, जो आता ६० हजारांच्या स्तरावर आहे.
Billionaire veteran investor and Akasa Air founder Rakesh Jhunjhunwala passes away at the age of 62 in Mumbai pic.twitter.com/36QcRfHXsa
— ANI (@ANI) August 14, 2022
राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे असंही संबोधलं जात होतं. त्यांनी नुकतीच आपली आकासा एअरलाईन्सही सुरू केली होती. ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या कंपनीनं ऑपरेशन्सला सुरूवात केली होती. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान आकासा एअरलाईन्सनं पहिलं उड्डाण घेतलं होतं. १३ ऑगस्ट पासून अकासा एअरनं अनेक मार्गांवर आपलं उड्डाण सुरू केलं होतं.
झुनझुनवाला यांची यशाची कहाणी केवळ ५ हजार रूपयांपासून सुरू होती. आज त्यांचं नेटवर्थ जवळपास ४० हजार कोटी रूपये आहे. त्यांच्या याच यशामुळे त्यांना भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असं म्हटलं जातं.
Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/DR2uIiiUb7
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
पंतप्रधानांकडूनशोक
राकेश झुनझुनवाला हे विनोदी, अंतर्दुष्टी असलेले होते. त्यांनी आर्थिक जगतात आपलं अमूल्य योगदान दिलं आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खुप उत्साही होते. त्यांच्या निधनानं अतिव दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.