Join us  

Rakesh Jhunjhunwala Dance Video: व्हिलचेअरवर असूनही जेव्हा ‘कजरा रे…’वर थिरकले होते राकेश झुनझुनवाला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 4:36 PM

शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Rakesh Jhunjhunwala Dance Video: शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुनझुनवाला हे हसमतमुख असलेले व्यक्तीमत्व होते. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये राकेश झुनझुनवाला हे ऐश्वर्या रायवर चित्रीत केलेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये राकेश झुनझुनवाला हे आपल्या जवळच्या काही लोकांसह कोणत्या फंक्शनमध्ये असल्याचं दिसत आहेत. यात ते व्हिलचेअरवर असूनही ऐश्वर्या रायवर चित्रीत करण्यात आलेल्या कजरा रे या गाण्यावरही थिरकताना दिसतानायत. आजारी असल्यानंतरही त्यांच्यातील उत्साह कमी झालेला दिसत नाहीये.कशी झाली सुरूवात?राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये पहिल्यांदा शेअर बाजारात पाऊल ठेवलं. त्यांनी 5 हजार रुपये गुंतवले आणि 1986 मध्ये पहिला नफा कमावला. त्यांनी टाटा टीचे शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले आणि तीन महिन्यांनी 143 रुपये प्रति शेअर या दराने विकले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 1986 ते 1989 या काळात त्यांनी 2 ते 2.5 कोटी रुपयांचा नफा कमावला. यानंतर सेसा स्टारलिट कंपनीचे चार लाख शेअर एक कोटी रुपयांना विकत घेतले आणि या गुंतवणुकीत भरघोस नफा कमावला.

2003 मध्ये राकेश झुनवाला यांनी टाटा समूहाची आणखी एक कंपनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीबच पालटवले. त्यांनी 6 कोटी शेअर्स प्रत्येकी तीन रुपये दराने खरेदी केले. आज त्या एका शेअरची किंमत 1,961.00 रुपये आहे. हा स्टॉक त्यांचा आवडता स्टॉक म्हणून ओळखला जायचा. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स होते. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, लुपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाव्यवसायशेअर बाजार