नवी दिल्ली – शेअर मार्केटमधील सर्वात चर्चेत नाव असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियामध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सच्या दरात सप्टेंबर महिन्यात वेगाने वाढ होताना दिसली. टाटा मोटर्स(Tata Motors) आणि टाइटन(Titan) या कंपनीचे शेअर्सही टाटाकडे आहेत. मागील एक महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या किंमती १३ टक्क्यांनी वाढल्या तर टाइटन कंपनीचे शेअर ११.४० टक्क्यांनी वधारले.
या दोन शेअर्सच्या दरात वाढ झाल्याने राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांच्या एकूण संपत्तीत जवळपास ८९३ कोटीपर्यंत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीमध्ये टाटा मोटर्सचे शेअरहोल्डर्सची गुंतवणूक ३,७७,५०००० शेअर्स होते. सप्टेंबर २०२१ मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची प्राइस हिस्ट्रीनुसार, NSE वर ऑटो स्टॉक २८७ रुपयावरुन वाढून ३३१ रुपये इतके झाले. प्रति शेअर ४३.७० रुपयाने वाढ झाली. यावेळी राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये टाटा मोटर्सच्या शेअर होल्डिंगमधून १६४.९६७५ कोटी कमाई केली.
Titan कंपनीत राकेश झुनझुनवालाचे शेअर्स
एप्रिल ते जून २०२१ तिमाही टाइटन कंपनीच्या शेअर्स बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपच्या या कंपनीत गुंतवणूक केली. टाइटन कंपनीत राकेश झुनझुनवाला ३,३०,१०,३९५ शेअर आहेत तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ९६,४०,५७५ शेअर आहेत. दोघांकडे एकूण ४,२६,५०,९७० शेअर्स आहेत. सप्टेंबर महिन्यात टाइटन कंपनीच्या शेअर्सची किंमत १९२१.६० वरून २०९२.५० पैसे इतके वाढले. राकेश झुनझुनवालाने या शेअरमधून ७२८ कोटींची कमाई केली. टाटा समुहाच्या या दोन शेअरने राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सप्टेंबर २०२१ मध्ये ८९३.८७ कोटी इतकी वाढली आहे. झुनझुनवालाने स्वत:च्या आणि पत्नीच्या नावावर गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला एंड असोसिएट्सजवळ ३८ स्टॉक असून एकूण संपत्ती २१ हजार ८९७ कोटी इतकी आहे. राकेश झुनझुनवाला हे हे चार्टर्ड अकाऊंटेट आहेत आणि एसेट फर्म रेयर एंटरप्राइजेस चालवतात.