बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांनी अलीकडेच मेटल स्टॉकमधील स्टेक वाढवला आहे. झुनझुनवाला यांनी अलीकडेच नाल्को (NALCO) आणि स्टील उत्पादक कंपनी सेलमधील (SAIL) त्यांचे स्टेक वाढवले आहेत. दोन्ही शेअर्सनं गेल्या एका वर्षात 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत. सप्टेंबरमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी नाल्कोमधील स्टेक वाढवला. नाल्को आणि सेल या दोन्ही सार्वजनिक कंपन्या आहेत आणि मेटल क्षेत्रात त्यांचे मजबूत अस्तित्व आहे.
झुनझुनवाला यांनी नाल्कोमधील त्यांचा हिस्सा 1.6 टक्क्यांवर वाढवला आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 29,097,400 शेअर्स आहेत, ज्यांचे एकूण मूल्य 569.3 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर २५७ टक्क्यांनी वधारला. त्यांनी यात एक फ्रेश पोझिशनही घेतली आहे. गेल्या वर्षभरात निफ्टी मेटल इंडेक्स 150 टक्क्यांनी वाढला. रिटर्नच्या बाबतीत हा इंडेक्स 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत टॉपवर होता. २० ऑक्टोबर रोजी हा शेअर १२४.७५ रूपयांवर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. परंतु यानंतर यामध्ये घसरण दिसून आली आणि आता हा शेअर १०१ रूपयांवर आला.
राकेश झुनझुनवाला यांनी सार्वजनिक क्षेत्रातील स्टील कंपनी सेलमध्येही आपला हिस्सा वाढवला आहे. किंबहुना, जगभरात कमोडिटीच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने मेटल स्टॉक्समध्ये उसळी दिसून येत आहे. यामुळेच झुनझुनवाला यांच्या होल्डिंगवाल्या या कंपन्यांच्या शेअर्सना फायदा मिळत आहे.याशिवाय त्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत कॅनरा बँक, फेडरल बँक आणि टाटा समूहाच्या टायटन कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे.