Lokmat Money > बिझनेस न्यूज > Rakesh Jhunjhunwala: “शेअर मार्केटच सर्वोच्च, तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही”; राकेश झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला

Rakesh Jhunjhunwala: “शेअर मार्केटच सर्वोच्च, तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही”; राकेश झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला

Rakesh Jhunjhunwala यांना हजारो गुंतवणूकदार फॉलो करत आपल्या गुंतवणुकीत बदल करत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:36 PM2022-02-18T18:36:06+5:302022-02-18T18:37:58+5:30

Rakesh Jhunjhunwala यांना हजारो गुंतवणूकदार फॉलो करत आपल्या गुंतवणुकीत बदल करत असतात.

rakesh jhunjhunwala give important advice to investors do not predicts share market | Rakesh Jhunjhunwala: “शेअर मार्केटच सर्वोच्च, तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही”; राकेश झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला

Rakesh Jhunjhunwala: “शेअर मार्केटच सर्वोच्च, तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही”; राकेश झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रंचड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्या आपले IPO ही सादर करताना पाहायला मिळत आहेत. काही कंपन्यांचे आयपीओ फ्लॉप ठरत असून, काही कंपन्या अल्पावधीतच दमदार परतावा देत आहेत. यातच शेअर मार्केटमधील बिग बूल नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी शेअर मार्केटमधील प्रस्थापित तसेच नवगुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला आहे. 

Rakesh Jhunjhunwala यांना हजारो गुंतवणूकदार फॉलो करत असतात. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोप्रमाणे आपल्या गुंतवणुकीत बदल करत असतात. याचा अनेकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जाते. राकेश झुनझुनवालांची आताच्या घडीला अब्जावधी रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्याच राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा संदेश दिला आहे. 

तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही

राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, शेअर बाजार हा एकमेव राजा आहे. तेच सर्वोच्च आहे, तुम्ही त्यावर कधीही वर्चस्व गाजवू शकत नाही. शेअर मार्केट नेहमीच अस्थिर आणि रहस्यमय असते. मी विकासक असतो तर मला सूचीबद्ध केले जाणार नाही. हा व्यवसाय सूचीसाठी योग्य नाही. ब्लू चिप कंपन्यांना १८ ते २५ टक्के भांडवलावर उच्च परतावा मिळतो. परंतु, आता रियल्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवल खर्ची पडत आहे. अब्जाधीश गुंतवणूकदार असलेले राकेश झुनझुनवाला म्हणाले की, ते रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खूप उत्साही आहेत. अलीकडेच मुंबईत मुकेश अंबानी यांच्या जवळच्या परिसरात राकेश झुनझुनवाला एक मोठी इमारत बांधत असल्याची माहिती समोर आली होती. 

दरम्यान, Akasa Air या नवीन उपक्रमाविषयी बोलताना राकेश झुनझुनवाला म्हणाले की, त्यांच्याकडे व्यवसाय आणि गेम प्लॅन असून, भविष्यात विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. आकासाला यापूर्वीच इंडिगोच्या ताफ्याच्या एक चतुर्थांश विमानांची डिलिव्हरी मिळाली आहे.
 काही प्रभावशाली एव्हिएशन दिग्गजांच्या पाठिंब्याने Akasa Air ने कार्यालयीन कामांसाठी सुमारे ५० कर्मचारी नियुक्त केले आहेत आणि आता पायलट, फ्लाइट अटेंडंट आणि विमानतळ कर्मचारी भरती करत आहेत, असे ते म्हणाले. 
 

Web Title: rakesh jhunjhunwala give important advice to investors do not predicts share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.