Lokmat Money > बिझनेस न्यूज > Akasa Air: नरेंद्र मोदींची भेट अन् लगेचच विमान कंपनीला परवानगी; राकेश झुनझुनवालांची आकासा एअर झेपावणार

Akasa Air: नरेंद्र मोदींची भेट अन् लगेचच विमान कंपनीला परवानगी; राकेश झुनझुनवालांची आकासा एअर झेपावणार

Rakesh Jhunjhunwala Akasa Air: देशातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित अशी विमानसेवा सुरु होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आज नागरी विमानोड्डाण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:32 PM2021-10-11T21:32:26+5:302021-10-11T21:34:29+5:30

Rakesh Jhunjhunwala Akasa Air: देशातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित अशी विमानसेवा सुरु होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आज नागरी विमानोड्डाण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली.

Rakesh Jhunjhunwala got permission of Akasa Air flying planes after visit PM Narendra Modi | Akasa Air: नरेंद्र मोदींची भेट अन् लगेचच विमान कंपनीला परवानगी; राकेश झुनझुनवालांची आकासा एअर झेपावणार

Akasa Air: नरेंद्र मोदींची भेट अन् लगेचच विमान कंपनीला परवानगी; राकेश झुनझुनवालांची आकासा एअर झेपावणार

प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या आकासा एअर (Akasa Air) ला विमान वाहतूक सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. आकासा एयरची कंपनी एसएनवी एविएशन प्राइवेट लिमिटेडने याची माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे झुनझुनवालांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या नंतर लगेचच त्यांना ही परवानगी मिळाली आहे. 

आकासा एअर २०२२ च्या उन्हाळी सुटीपूर्वी आपली विमान सेवा सुरु करणार आहे. आकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांनी सांगितले की, नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने एनओसी दिल्याने आम्ही आभारी आहोत. आकासा एअरलाईन नियमात राहून सुरु करण्यासाठी रेग्युलेटरी ऑथोरिटीसोबत काम करणार आहोत. आकासा एअर ही भारतीयांसाठी सर्वात जास्त परवडणारी आणि ग्रीनेस्ट एअरलाईन असेल. 

दुबे यांनी पुढे म्हटले की, आकासा एअर देशाच्या विकासासाठी एक मजबूत एअर ट्रान्सफॉर्मेशन सिस्टिम असेल. ही विमानसेवा भारतीय प्रवाशांना सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक भेदभाव न ठेवता समान सेवा देणार आहे. राकेश झुनझुनवाला यांनी आकासा एअरमध्ये पहिल्या टप्प्यात ४३.७५ कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यांनी यामध्ये एकूण २४७.५ कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. याशिवाय दुबईचे एक गुंतवणूकदार आणि न्यू होरायझन इन्व्हेस्टमेंट फंडाचे व्यवस्थापक माधव भटकुली यांनी ६.२४ कोटी रुपये गुंतविले आहेत. 

Web Title: Rakesh Jhunjhunwala got permission of Akasa Air flying planes after visit PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.