Join us

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवालांचा जबरदस्त स्टॉक! या शेअरनं 1 लाखाचे केले 5 कोटी, आपल्याकडे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 4:48 PM

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या एका फेव्हरिट स्टॉकने सध्या रॉकेट स्पीड घेतला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेला  टायटन कंपनीचा स्टॉक हा त्यांचा अत्यंत फेव्हरिट स्टॉक आहे. टाटा समूहाच्या या कंपनीमध्ये बिगबुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही मोठी हिस्सेदारी आहे.

टायटनच्या शेअरची कमाल!शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. खरे तर झुनझुनवाला हे नेहमीच चांगला स्टॉक ओळखून त्यावर डाव लावत असतात. यावेळी टाटा समूहाच्या 2 स्टॉक्सनी जबरदस्त परफॉर्म केले आहे. झुनझुनवाला यांनी त्यांच्या आवडत्या, टायटन आणि टाटा मोटर्स या कंपनीच्या स्टॉकमधून अवघ्या एका दिवसात त्यांची एकूण संपत्ती 590 कोटी रुपयांनी वाढवली आहे.

टायटनच्या शेअरचा इतिहास - सध्या टायटनचा शेअर ऑल टाइम हायवरून घसरताना दिसत आहे. मार्च 2022 पासून हा स्टॉक 25% पेक्षा जास्त घसरला आहे. मात्र, असे असले, तरी या स्टॉकने गुंतवणूकदारांना एका वर्षात 20 टक्के एवढा परतावा दिला आहे. 5 वर्षांचा विचार करता या स्टॉकने 305 टक्के एवढा परतावा दिला आहे. जर, एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी यात गुंतवणूक केली असेल, तर आज या स्टॉकने त्याला 840 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला असेल.

जर एखाद्याने गेल्या 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 4.05 लाख रुपये झाले असते. पण जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर या स्टॉकने त्याला आता कोट्यधीश बनवले असते. 20 वर्षात या स्टॉकने 1 लाख रुपयांचे 5.50 कोटी रुपये केले आहेत. 

किती आहे राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी? राकेश झुनझुनवाला यांच्या स्टेकबद्दल बोलायचे झाल्यास, आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरच्या तिमाहीनुसार, राकेश झुनझुनवाला यांची टायटन कंपनीमध्ये 3.98% एवढी भागीदारी आहे. म्हणजेच त्यांच्याकडे टायटनचे जवळपास 3,53,10,395 शेअर्स आहेत. तसेच त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटनमध्ये 1.07 टक्के एवढी भागीदारी आहे. एकूणच, झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारशेअर बाजारटाटा