Join us

Rakesh Jhunjhunwala : प्रत्येक व्यक्ती 5 लाख कमावेल, इंडिया का टाईम आ गया; झुनझुनवालांनी मोदींना सांगितलेला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 3:44 PM

Rakesh Jhunjhunwala And Narendra Modi : राकेश झुनझुनवाला यांनी गेल्याच वर्षी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. इंडिया का टाईम आ गया असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते. भारताचं आर्थिक चित्र खूप बदलणार आहे. ज्याची कल्पनादेखील कोणी केली नसेल, असं म्हटलं होतं.

नवी दिल्ली - शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची सुरुवात केली होती. आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू केलं आणि त्यानंतर ते कोट्यधीश झाले. 

राकेश झुनझुनवाला यांनी गेल्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. इंडिया का टाईम आ गया, असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते. भारताचं आर्थिक चित्र खूप बदलणार आहे. ज्याची कल्पनादेखील कोणी केली नसेल, असं म्हटलं होतं. दूरदृष्टी असलेलं व्यक्तीमत्त्व, भारताच्या भवितव्याची स्वप्नं असलेला कोट्यधीश गुंतवणूकदार अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी झुनझुनवाला यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या भेटीत झुनझुनवाला यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं. 2030 पर्यंत प्रत्येक भारतीयाचं उत्पन्न सहा हजार डॉलरच्या पुढे जाऊ शकतं, असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते.

भारताने समाजवादाच्या विचारसरणीने आपला प्रवास सुरू केला. आता व्यवहारिक आर्थिक धोरणांनी देश पुढे जात आहे. यामुळे आर्थिक विकास दर वाढेल. त्यामुळे सामाजिक कल्याणात सुधारणा होईल, असं झुनझुनवाला यांनी म्हटलं होतं. गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या जागी एका आयोगाची स्थापना करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला होता. या आयोगामध्ये कुशल नोकरशाह, प्रसिद्ध उद्योगपती आणि शेअर बाजारातील दिग्गजांचा समावेश असावा. कृषी उत्पादकता वाढवायला हवी आणि त्या उत्पादनांच्या निर्यातीच्या दिशेनं काम करायला हवं, असं झुनझुनवाला म्हणाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण 100 डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या स्तरावर आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे असंही संबोधलं जात होतं. त्यांनी नुकतीच आपली आकासा एअरलाईन्सही सुरू केली होती. 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या कंपनीनं ऑपरेशन्सला सुरूवात केली होती. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान आकासा एअरलाईन्सनं पहिलं उड्डाण घेतलं होतं. 13 ऑगस्टपासून आकासा एअरने अनेक मार्गांवर आपलं उड्डाण सुरू केलं होतं. 

टॅग्स :राकेश झुनझुनवालानरेंद्र मोदीशेअर बाजार