Lokmat Money > बिझनेस न्यूज > डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

दमानी यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:41 PM2022-08-22T19:41:54+5:302022-08-22T19:45:31+5:30

दमानी यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत.

rakesh jhunjhunwala trust to be managed by dmart radhakishan damani as main trustee details here | डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

Rakesh Jhunjhunwala Trust : देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची ट्रस्टचं काम त्यांचे विश्वासू मित्र, मार्गदर्शक आणि अनुभवी गुंतवणूकदार-उद्योजक राधाकिशन दमानी हाताळणार असल्याचं समजतंय. त्यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. अन्य दोन विश्वस्तांमध्ये कल्पराज धरणशी आणि अमल पारीख यांचा समावेश आहे. हे दोघेही झुनझुनवाला यांचे अत्यंत विश्वासार्ह सोबती आहेत.

झुनझुनवाला यांची कंपनी रेयर एंटरप्रायझेस (Rare Enterprises) च्या व्यवस्थापनाची जबाबदारी राकेश झुनझुनवाला यांचे दोन सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोएला हे यांच्याकडेच राहिल. उत्पल सेठ झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी मदत करत होते आणि गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने प्रायव्हेट इक्विटी इनव्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित करत होते. अमित गोएला हे ट्रेडिंगच्या बाबतीत झुनझुनवाला यांचा राईड हँड मानले जात होते. तसंच ते स्वतंत्रपणे कंपनीचे ट्रेडिंग बुक सांभाळत होते.

राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या पत्नी आणि तीन मुलांसाठी लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील गुंतवणूकीसह अब्जावधींची मालमत्ता मागे ठेवली आहे. त्याचे मृत्युपत्र सागर असोसिएट्सचे माजी व्यवस्थापकीय भागीदार बर्गेस देसाई यांनी तयार केल्याचे समजते. फोर्ब्सनुसार झुनझुनवाला हे भारतातील ४८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या एकूण संपत्तीचं मूल्य ५.८ अब्ज डॉलर्सची आहे. सध्याच्या किंमतीनुसार त्यांच्या लिस्टेड होल्डिंग्सची किंमत ३० हजार कोटी रुपये आहे.

 

Web Title: rakesh jhunjhunwala trust to be managed by dmart radhakishan damani as main trustee details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.