Join us

राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने बनवला नवा रेकॉर्ड, अब्जाधीशांच्या यादीत मिळवले 30 वे स्थान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 4:59 PM

Rakesh Jhunjhunwala wife Rekha Jhunjhunwala : 59 वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती (Rekha Jhunjhunwala Net Worth) 47,650.76 कोटी रुपये (5.9 अब्ज डॉलर) आहे.

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपैकी एक असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2022 (Forbes India Rich list) मध्ये स्थान मिळवले आहे. रेखा यांनी आपल्या पतीची जागा घेतली आहे. देशातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांना 30 वे स्थान देण्यात आले आहे. 

59 वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती (Rekha Jhunjhunwala Net Worth) 47,650.76 कोटी रुपये (5.9 अब्ज डॉलर) आहे. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँडचा समावेश आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी 37 वर्षात शेअर बाजारात आपल्या कुशलतेने आपली एकूण संपत्ती 5,000 रुपयांवरून 5.5 अब्ज डॉलर इतकी वाढवली. फोर्ब्सच्या 2021 च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, ते भारतातील 36 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होते. गेल्या वर्षी त्यांनी 18 स्थानांनी झेप घेत 36 व्या स्थानावर आले होते. या वर्षी त्यांच्या पत्नी सहा स्थानांची पुढे आल्या आहेत.

अकासा एअरलाईन सुरू होण्याआधी निधनराकेश झुनझुनवाला हे मृत्यूआधी खूप आजारी होते. सार्वजनिक ठिकाणीही ते अनेक वेळा व्हीलचेअरवर असल्याचे दिसून येत होते. राकेश झुनझुनवाला हे किडनीशी संबंधित आजार आणि इस्केमिक हृदयविकाराने त्रस्त होते. राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरलाईन सुरू होण्याच्या एक आठवडा आधी त्यांचा मृत्यू झाला. रेखा आणि राकेश झुनझुनवाला यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत.

गौतम अदानी अव्वल या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानी पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर आहे. तर मुकेश अंबानी 88 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या एकूण निव्वळ संपत्तीचा वाटा टॉप टेनच्या संयुक्त निव्वळ संपत्तीच्या 30 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील 100 अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाव्यवसाय