Join us

Rakesh Jhunjhunwala: पुढील वर्षी राकेश झुनझुनवालांच्या विमानातून करा प्रवास; ७२ विमानांची दिली ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:44 PM

या करारानुसार ७२ विमानांची किंमत जवळपास ९ अरब डॉलर इतकी आहे

नवी दिल्ली – भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) लवकरच नवीन स्वस्त एअरलाईन्सची सुरुवात करणार आहे. राकेश झुनझुनवाला यांची Akasa एअरलाईन्सनं मंगळवारी ग्लोबल एयरोस्पेस कंपनी बोइंग ७२ मॅक्स ७३७ विमानांची ऑर्डर दिली आहे. SNV एविएशन प्रायव्हेट लिमिटेड ब्रॅड Akasa Air नावाने उड्डाण घेणार आहे.

कंपनीच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की, या करारानुसार ७२ विमानांची किंमत जवळपास ९ अरब डॉलर इतकी आहे. अकासा एअरच्या ऑर्डरमध्ये ७३७ मॅक्स फॅमिलीचे २ व्हेरिएंटस प्लेनचाही समावेश आहे. ज्यात ७३७-८ आणि हाय कॅपिसिटीवाला ७३७-८-२०० यांचाही सहभाग आहे.

राकेश झुनझुनवाला स्वस्त एअरलाइन्स सुरु करण्याचा प्लॅन

Akasa Air चे सीईओ विनय दुबे म्हणाले की, कमी खर्चात उत्तम विमान प्रवास देण्यासाठी स्वस्त एअरलाईन्स सुरु करण्याचं उद्दिष्ट या व्यवहारामुळे पूर्ण होणार आहे. त्याशिवाय बोइंग ७३७ मॅक्स प्लेन पर्यावराच्या दृष्टीनेही अनुकूल आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान बाजारांपैकी एक आहे. भारतात हवाई मार्गाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. अकासा एअरलाईन्सचं लक्ष्य लोकांना स्वस्त विमानप्रवास देण्याचं आहे. अकासा कंपनीजवळ ७३७ मॅक्स विमान असल्यानं भारतीय बाजारात वेगाने ही कंपनी प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नागरी विमान मंत्रालयानेही NOC दिली

राकेश झुनझुनवाला यांची Akasa एअरलाईन्सला नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने ना हरकत परवाना दिला आहे. पुढील वर्षापासून अकासा एअरलाईन्स विमानं हवेत उड्डाण घेतील. नव्या एअरलाईन्स कंपनीच्या बोर्डात इंडिगोचा माजी अध्यक्ष आदित्य घोष यांचाही समावेश आहे. नव्या एअरलाईन्समध्ये राकेश झुनझुनवाला यांची ४० टक्के भागीदारी आहे. या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांनी ३५ मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. २०२२ च्या एप्रिल-मे महिन्यापर्यंत भारतात अकासा एअरलाईन्स सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवाला