Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी रक्षाबंधन ऑफर, 74 रुपयांत अनलिमिडेट कॉल !

बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी रक्षाबंधन ऑफर, 74 रुपयांत अनलिमिडेट कॉल !

बीएसएनएनले एक नवीन प्लॅन आणला असून राखी पे सौगात असे आहे. हा प्लॅन 74 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 1 जीबी डाटा मिळणार आहे. राखी पे सौगात हा प्लॅन 3 ऑगस्टपासून लॉन्च करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 02:18 PM2017-08-02T14:18:54+5:302017-08-02T14:19:59+5:30

बीएसएनएनले एक नवीन प्लॅन आणला असून राखी पे सौगात असे आहे. हा प्लॅन 74 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 1 जीबी डाटा मिळणार आहे. राखी पे सौगात हा प्लॅन 3 ऑगस्टपासून लॉन्च करण्यात येणार आहे.

Rakshabandhan offer for BSNL customers, unlimited call to 74 rupees! | बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी रक्षाबंधन ऑफर, 74 रुपयांत अनलिमिडेट कॉल !

बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी रक्षाबंधन ऑफर, 74 रुपयांत अनलिमिडेट कॉल !

नवी दिल्ली, दि. 02 - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांचासाठी रक्षाबंधन सणानिमित्त खास ऑफर आणली आहे. बीएसएनएनले एक नवीन प्लॅन आणला असून 'राखी पे सौगात' असे नाव आहे. हा प्लॅन 74 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 1 जीबी डाटा मिळणार आहे. 'राखी पे सौगात' हा प्लॅन 3 ऑगस्टपासून लॉन्च करण्यात येणार आहे. हा प्लॅन फक्त 12 दिवसांसाठी असणार आहे. 
75 रुपयांच्या ' राखी पे सौगात' या प्लॅनची मर्यादा अवघ्या पाच दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करता येणार आहे. तसेच, डेटा मिळणारा आहे. बीएसएनएलचे बोर्ड डायरेक्टर आर. के. मित्तल यांनी सांगितले की, बीएसएनएल कंपनी अनेक रिचार्ज प्लॅन बाजारात आणले आहेत. कॉम्बो प्लॅन सुद्धा आणला आहे. तसेच, 189, 289 आणि 389 रुपयांच्या प्लॅनवर सुद्धा चांगल्या ऑफर देण्यात आला आहे. 
रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' या ऑफरला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन, एअरटेल आणि आयडिया या कपंन्यांनी सुद्धा अनेक मोबाईल प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने समर सरप्राइज बंद केल्यानंतर 'धन धना धन' ही  ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली. यानंतर इतर कंपन्यांनी सुद्धा स्वस्तातले प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी आणण्याचा धमाकाच लावला. गेल्या काही दिवसांपूर्वी व्होडाफोन कंपनीने 244 रुपयांचा प्लॅन आणला आहे. व्होडाफोनच्या 244 रुपयांच्या या प्लॅनला 70 दिवसांची वैधता देण्यात आली. याचबरोबर व्होडाफोनने 56 दिवसांच्या वैधतेसह 346  रुपयांची आणखी एक योजना आणली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 जीबी डेटा मिळणार आहे.
एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एक नवा डेटा टेरिफ प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या या नव्या प्लॅनमध्ये दररोज तब्बल 3 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. आपला हा खास प्लॅन एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैधता असणार आहे. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही ग्राहकांना मिळणार आहे.

 

Web Title: Rakshabandhan offer for BSNL customers, unlimited call to 74 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.