Lokmat Money > बिझनेस न्यूज > रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल...

रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल...

Kirloskar Brothers Limited : रमा किर्लोस्कर कंपनीच्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग आणि वॉल्व व्यवसायाचे नेतृत्व करतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:57 PM2021-08-04T14:57:59+5:302021-08-04T14:58:44+5:30

Kirloskar Brothers Limited : रमा किर्लोस्कर कंपनीच्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग आणि वॉल्व व्यवसायाचे नेतृत्व करतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

Rama Kirloskar appointed Joint Managing Director of kirloskar brothers limited | रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल...

रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल...

Highlights रमा किर्लोस्कर कंपनीच्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग आणि वॉल्व व्यवसायाचे नेतृत्व करतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या (KBL) सह-व्यवस्थापकीय संचालकपदी रमा किर्लोस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमा किर्लोस्कर या किर्लोस्कर कुटुंबातील पाचव्या पीढीतील उद्योजिका आहेत. तसंच त्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या कन्या आहेत. 

३ ऑगस्ट रोजी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिडेटकडून रमा किर्लोस्कर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग व्हॉल्व्ह बिझनेसचं नेतृत्व करणार असल्याचं कंपनीनं नियामकाला सांगितलं. रमा किर्लोस्कर या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे सध्या किर्लोस्कर इबारा पंप्स लिमिटेडच्या (KEPL) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे. केईपीएल ही जपानची इबारा कॉर्पोरेशन आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांचं जॉईंट व्हेन्चर आहे. 

केबीएल बोर्डाचे संचालक आणि किर्लोस्कर ब्रदर्स इंटरनॅशनल बीव्हीचे (ज्यात एसपीपी पंप लिमिटेड यांचा समावेश आहे) मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक किर्लोस्कर सर्व परदेशी व्यवसायांचे नेतृत्व करत आहेत आणि कंपनीमध्ये अनेक तंत्रज्ञान उपक्रमांचे नेतृत्व करत असल्याचं केबीएलने आपल्या नियामक फाईलिंगमध्ये नमूद केलं आहे. "या बदलामुळे, किर्लोस्कर कुटुंबाची पाचवी पिढी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीच्या वाढीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंपनीकडून उत्पादन कंपनी बनवण्याच्या मोठ्या बदलांशी सुसंगत आहे," असंही कंपनीनं फायलिंगमध्ये नमूद केलं. 

Web Title: Rama Kirloskar appointed Joint Managing Director of kirloskar brothers limited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.