Join us  

Ramdev Baba: रामदेव बाबांच्या रुची सोयाने बनविले कंगाल; गेल्या 55 दिवसांपासून गुंतवणूकदारांचे होतेय नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:48 PM

Ruchi Soya share falling: रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे.

रामदेव बाबा (Ramdev baba) आपल्या ग्रुपच्या आणि त्याच्या कंपन्यांबाबत मोठमोठे दावे करत असले, तरीदेखील रुची सोयाच्या (Ruchi Soya) शेअरनी गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. गेल्या 55 दिवसांपासून रुची सोयाचे शेअर कमालीचे घसरले असून ज्याच्याकडे 1000 शेअर होते तो तब्बल 2.17 लाखांहून अधिक रुपयांना धुपला आहे. (Ruchi soya stock droping down in last 55 days, Ramdev baba announces NFO.)

Ratan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार

शेअरधारकांचे गेल्या दोन महिन्यांत 17 टक्के नुकसान झाले आहे. हे शेअर 17 टक्क्यांनी घसरले आहेत. धक्कादायक म्हणजे रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे. यामुळे प्रमोटर्सची शेअरिंग कंपनीपेक्षा कमी होईल आणि कंपनीला आपल्या कर्जातून मुक्ती मिळेल. दुसरीकडे पतंजलीचा आयपीओ आणण्याचीही तयारी केली जात आहे. चला जाणून घेऊया गुंतवणूकदारांना कितीचे नुकसान झाले आहे. 

55 दिवसांत रुची सोयाचा शेअर 17 टक्क्यांनी घसरला आहे. गेले दोन महिने रुची सोयासाठी काही खास नव्हते. आकडेवारीनुसार 9 जून 2021 ला कंपनीच्या शेअरची किंमत 1317 रुपये होती. यानंतर कंपनीच्या शेअर धडाधड कोसळू लागले. आज कंपनीचा शेअर 1101.80 रुपयांवर आला आहे. या काळात कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. 

Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...

1000 शेअर घेतलेल्यांना 2.17 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. शेअरची किंमत घसरली तर काही गुंतवणूकदारांना फायदा, तर काहींना तोटा होतो. 1317 रुपयांनुसार 1000 शेअरची किंमत 13,17,000 झाली होती. आता हीच किंमत 11,01,800 रुपयांवर आली आहे.

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीशेअर बाजार