नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेटल्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीत घट करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत सरकार गेल्या काही वर्षांपासून इथेनॉलच्या (Ethanol) ब्लेंडिंगवर (Blending) जास्त भर देत आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून निवडक पेट्रोल पंपावर 20 टक्के Ethanol Blending असणारे पेट्रेल-डिझेल मिळणार आहे. यामुळे इंधनाच्या किंमतीत घट होणार असल्याचे म्हटले जात आहे. पेट्रोल-डिझेलसाठी भारत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले. तसेच, जोपर्यंत स्थानिक उत्पादने वाढवली जात नाहीत, तोपर्यंत इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवता येणार नाही, असेही रामेश्वर तेली म्हणाले.
अमेठी येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन रामेश्वर तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, "देशातील 83 टक्के इंधन आम्ही बाहेरून आणतो. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहोत. जोपर्यंत आपले उत्पादन वाढत नाही तोपर्यंत तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवता येणार नाही."
याचबरोबर, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढतात, त्यावेळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाच्या किंमती वाढवतात. आंतरराष्ट्रीय बाजारावरील निर्भरता कशी कमी करता येईल, या दिशेन सरकार काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, नवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत, असे रामेश्वर तेली यांनी सांगितले.
नव-नवीन ठिकाणी तेल साठे शोधण्याचे प्रयत्नयाशिवाय, देशात नव-नवीन ठिकाणी तेल साठे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्ये आहेत. पण तिथेही तेलाचा शोध घेतला जाईल, असेही रामेश्वर तेली म्हणाले. तत्पूर्वी, या कार्यक्रमात रामेश्वर तेली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.