नवी दिल्ली : येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची बँक व डिमॅट खाती तसेच म्युच्युअल फंडांमधील रक्कम जप्त करण्याचा आदेश भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ (सेबी)ने काढला आहे. (Rana Kapoor's bank, demat accounts seized; Orders issued by SEBI)
सेबीने ठोठावलेल्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची वसुली करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. येस बँकेची नोंदणी नसलेल्या प्रवर्तक कंपनी इकाई मॉर्गन क्रेडिट बरोबर करण्यात आलेल्या व्यवहारांचा खुलासा राणा कपूर यांना करता आला नव्हता. त्यामुळे सेबीने सप्टेंबर, २०२० मध्ये हा दंड ठोठावला होता. कपूरकडे या दंडाशिवाय ४.५३ लाख रुपयांचे व्याज आणि वसुलीचा खर्च रुपये १००० अशी रक्कम बाकी आहे. ही रक्कम अद्यापही न भरल्याने सेबीने आता जप्तीची कारवाई केली आहे.
सेबीने बँका, म्युच्युअल फंड आणि डिपॉझिटरीना कपूर याच्या खात्यांमधून कोणतीही रक्कम न काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सेबीने बँकांना कपूर याची खाती आणि लॉकर जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
राणा कपूरची बँक, डिमॅट खाती जप्त; सेबीने दिले आदेश
येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची बँक व डिमॅट खाती तसेच म्युच्युअल फंडांमधील रक्कम जप्त करण्याचा आदेश भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ (सेबी)ने काढला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:19 AM2021-03-30T06:19:20+5:302021-03-30T06:20:45+5:30