Join us  

विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 6:31 AM

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

नवी दिल्ली :

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघे एकत्र आल्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणखी एक ब्रँड तयार झाला असून, तो विराट-अनुष्का, रणबीर-दीपिका यांच्या नावापेक्षा अधिक महागडा असण्याची शक्यता आहे. आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू रणबीर कपूरच्या ब्रँड व्हॅल्यूपेक्षा दुप्पट आहे. आलियाची ब्रँड व्हॅल्यू ६.८ कोटी डॉलर आहे. तर, रणबीर कपूरची ब्रँड व्हॅल्यू २.६ कोटी डॉलर आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत आलियाने अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोन यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. 

संपत्ती आलिया १५८ कोटी रुपयेरणबीर ३३७ कोटी रुपयेब्रँड व्हॅल्यू

वाहनेआलिया = ऑडी क्यू ७, ऑडी क्यू ५, ऑडी ए ६, बीएमडब्ल्यू ७ सीरीज, लॅण्ड रोवर, रेंज रोवररणबीर =   रेंज रोवर वोग, ऑडी आर ८, मर्सिडीज जी ६३, रेंज रोवरमानधनआलिया ५-८ कोटी रुपये एका चित्रपटासाठीरणबीर ५० कोटी रुपये एका चित्रपटासाठी

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठआलिया भटरणबीर कपूर