Join us  

जबरदस्त! भारताच्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ; पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 5:43 PM

भारताच्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली आहे. पहिल्यांदाच भारताचा अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलरवर गेली आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्यांदाच देशाच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला असून यासह देश जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे.  आता भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडिपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. काही दिवसापूर्वीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला होता. 

खरंच No Cost EMI मध्ये व्याज द्यावं लागत नाही का? पाहा या भूरळ पाडणाऱ्या स्कीममागील सत्य

शक्तीकांता दास यांनी ३१ ऑक्टोबर रोजी एका निवेदनात म्हटले होते की, आर्थिक घडामोडी पाहता काही प्राथमिक आकडे समोर आले आहेत, यामुळे मला आशा आहे की नोव्हेंबरच्या अखेरीस दुसर्‍या तिमाहीत येणारे जीडीपीचे आकडे धक्कादायक असतील. जीडीपी लाइव्ह डेटावर नजर टाकली तर, जी चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या जवळ आहे, भारताने १८ नोव्हेंबरच्या रात्रीच हा टप्पा गाठला होता आणि पहिल्यांदाच ४ ट्रिलियनचा टप्पा पार केला होता. मात्र, भारत अजूनही चौथ्या स्थानापासून दूर आहे. सध्या जर्मनी हा जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे, भारत आणि त्यांच्यातील दरी बरीच कमी झाली आहे.

भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तर अमेरिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, त्यांची अर्थव्यवस्था २६.७ ट्रिलियन डॉलर आहे. यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९.२४ ट्रिलियन डॉलर आहे. ४.३९ ट्रिलियन डॉलर्ससह जपान तिसऱ्या स्थानावर आहे. या बाबतीत जर्मनी चौथ्या स्थानावर आहे आणि तिची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर्स आहे. २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य. आता केंद्र सरकारचे पुढील लक्ष्य देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे आहे. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि यासह ती आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

टॅग्स :व्यवसायभारतीय रिझर्व्ह बँक