चेन्नई : देशातील सर्व विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींच्या विरोधात चेन्नई येथील विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ५00 कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली.
तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय आणि केंद्रीय अध्यक्ष एस.आर. संतानम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने देशातील १२५ विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चेन्नई विमानतळाचेही खाजगीकरण होणार आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी खाजगीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. केंद्राचा हा धोरणात्मक निर्णय आहे.
विमानतळ खाजगीकरणास कर्मचा-यांचा तीव्र विरोध
देशातील सर्व विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींच्या विरोधात चेन्नई येथील विमानतळावर भारतीय
By admin | Published: February 12, 2015 12:24 AM2015-02-12T00:24:39+5:302015-02-12T00:24:39+5:30