Rasna founder Areez Pirojshaw Khambatta : रसना ग्रुपचे (Rasna Group) संस्थापक आणि चेअरमन आरीज पिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालं. सोमवारी रसना कंपनीनं याबाबत माहिती दिली. कंपनी संस्थापक आणि चेअरमन अरीज आरीज पिरोजशॉ खंबाटा यांचं शनिवारी निधन झाल्याची माहिती कंपनीनं दिली. ते ८५ वर्षांचं होते.
रसना ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार अरीज खंबाटा हे बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष देखील होते. ते WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी झोरास्ट्रीयन्स) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतचे माजी अध्यक्ष देखील होते. खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
६० देशांमध्ये रसनाची ओळख
अरीज पिरोजशॉ खंबाटा हे घरगुती पेय रसना या ब्रँडसाठी ओळखले जाते. आज रसनाने जगातील ६० देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे. देशातील १८ लाख लहान-मोठ्या दुकानांमध्ये लोकप्रिय रसनाची विक्रीही केली जाते. 1970 च्या दशकात खंबाटा यांनी बाजारात महागड्या कोल्ड्रिंक्सवर मात करून लोकांना स्वस्त पर्याय दिला. ज्यानंतर रसना अल्पावधीतच देशात आणि जगात लोकप्रिय झाली.