Join us

Ratan Tata Airbus Aircraft : एअरबसच्या विमानांना टाटांचे ‘मेक इन इंडिया दरवाजे’, मिळालं मोठं कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:09 PM

एअरबसच्या विमानांना (Airbus Aircraft) आता भारतात तयार करण्यात येणारे दरवाजे लावण्यात येणार आहेत. असं पहिल्यांदाच घडणार आहे.

Ratan Tata Airbus Aircraft : एअरबसच्या विमानांना (Airbus Aircraft) आता भारतात तयार करण्यात येणारे दरवाजे लावण्यात येणार आहेत. असं पहिल्यांदाच घडणार आहे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम लिमिडेट (Tata Advanced Systems Limited) त्यांच्या हैदराबाद येथील प्रकल्पामध्ये A320 निओ विमानांसाठी कार्गो आणि बल्क कार्गो दरवाजे तयार करेल. एअरबस एअरक्राफ्टनं बुधवारी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडला A320 निओ विमानांसाठी कार्गो आणि बल्क कार्गो दरवाजे तयार करण्याचं कंत्राट दिलं. एअरलाईन मार्केटमध्ये एअरबसला आणखी पुढे नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

टीएएसएल हैदराबादमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरून हे दरवाजे तयार करेल. प्रत्येक शिपसेटमध्ये दोन कार्गो दरवाजे आणि एक बल्क कार्गो दरवाजाचा समावेश असेल. हैदराबादमध्ये एसव्हीपी,  एअरबसचे एअरोस्ट्रक्चर प्रोक्योरमें ऑलिवियर कॉक्विल आणि  टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडचे व्हीपी आणि एचओ एरोस्ट्रक्चर आणि एरो-इंजिन मसूद हुसैनी यांनी करारावर स्वाक्षरी केली.

फ्रेंच कंपनी एअरबसची स्थापना १९७० मध्ये झाली. जर्मनी, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि स्पेन या चार देशांमधील सोळा ठिकाणी एअरबस अंदाजे ५७ हजार कर्मचारी काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरबसमधील प्रमुख लोकांमध्ये सीईओ थॉमस अँडर्स, सीएफओ हॅराल्ड विल्हेम, मुख्य व्यावसायिक अधिकारी जॉन लेही आणि सीओओ फॅब्रिस ब्रेगियर यांचा समावेश आहे. 

विमान ऑर्डर्समध्ये अव्वल२०२२ मध्ये, एअरबसनं १,०७८ जेट ऑर्डरनंतर नवीन विमान ऑर्डर आणि डिलिव्हरीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. एअरबसनं गेल्या वर्षी ६६१ विमानं सोपवली, जी २०२१ च्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढली आहे. तर बोईंगनं ४८० विमाने दिली आहेत.

टॅग्स :टाटाविमानमेक इन इंडियाव्यवसाय