Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी साकार करतील नवभारताचे स्वप्न, रतन टाटा यांना विश्वास; धडाडी व निर्णयक्षमता यांचे कौतुक

मोदी साकार करतील नवभारताचे स्वप्न, रतन टाटा यांना विश्वास; धडाडी व निर्णयक्षमता यांचे कौतुक

देशात आमूलाग्र बदल घडवून ‘नवभारत’ उभारणीचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की साकार करतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे सन्मान्य अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:35 AM2017-09-21T01:35:33+5:302017-09-21T01:35:36+5:30

देशात आमूलाग्र बदल घडवून ‘नवभारत’ उभारणीचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की साकार करतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे सन्मान्य अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे.

Ratan Tata believes in Modi's dream; Praise of aggression and decision-making | मोदी साकार करतील नवभारताचे स्वप्न, रतन टाटा यांना विश्वास; धडाडी व निर्णयक्षमता यांचे कौतुक

मोदी साकार करतील नवभारताचे स्वप्न, रतन टाटा यांना विश्वास; धडाडी व निर्णयक्षमता यांचे कौतुक

नवी दिल्ली : देशात आमूलाग्र बदल घडवून ‘नवभारत’ उभारणीचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की साकार करतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे सन्मान्य अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे.
एका इंग्रजी वित्तीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टाटा म्हणाले की, भारतापुढील प्रश्नांकडे एका नावीन्यपूर्ण दृष्टीने पाहून त्यांची सोडवणूक करण्यास मोदी सक्षम आहेत. त्यामुळे ते वचन देतात, त्याप्रमाणे नवभारत निर्माण करू शकतील, याबाबत मी तरी आशावादी आहे.
रतन टाटा म्हणाले की, पंतप्रधान म्हणून मोदी एक नवा भारत उभारू पाहात आहेत. त्यासाठी आपण त्यांना संधी द्यायला हवी, असे मला वाटते.
‘नॅनो’ मोटारींचा प. बंगालमधील सिंगूर येथील कारखाना बंद करावा लागल्यावर तो कुठे हलवावा, असा प्रश्न आल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी टाटा समूहाला त्या राज्यात नवे घर दिले. तुम्ही जमीन देत असाल तर कारखाना गुजरातमध्ये आणू, असे सांगितल्यावर मोदींनी तीन दिवसांत जमीन देण्याचे आश्वासन दिले आणि ते खरोखरच पूर्ण केले, असे सांगून टाटा यांनी मोदींची धडाडी व निर्णयक्षमता यांचे कौतुक केले.

Web Title: Ratan Tata believes in Modi's dream; Praise of aggression and decision-making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.