Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांच्या Titan ने निर्माण केली वेगळी ओळख, गुंतवणूकदार झारे कोट्यधीश! कसे जाणून घ्या...

रतन टाटांच्या Titan ने निर्माण केली वेगळी ओळख, गुंतवणूकदार झारे कोट्यधीश! कसे जाणून घ्या...

Tata Group Titan: टाटा समूहाची शान असलेल्या टायटन (TITAN) कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:40 PM2023-01-10T17:40:29+5:302023-01-10T17:41:48+5:30

Tata Group Titan: टाटा समूहाची शान असलेल्या टायटन (TITAN) कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.

ratan tata company titan make brand as a watch perfume and jewellary titan shares gave bumper return | रतन टाटांच्या Titan ने निर्माण केली वेगळी ओळख, गुंतवणूकदार झारे कोट्यधीश! कसे जाणून घ्या...

रतन टाटांच्या Titan ने निर्माण केली वेगळी ओळख, गुंतवणूकदार झारे कोट्यधीश! कसे जाणून घ्या...

Tata Group Titan: टाटा समूहाची शान असलेल्या टायटन (TITAN) कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. ३८ वर्षांपूर्वी कंपनीनं घड्याळांच्या बाजारात प्रवेश केला आणि आज टायटनच्या घड्याळांनी बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच कंपनीचे शेअर्सही गुंतवणूकदारांना मोठा फायदा देत आहेत.

टायटनच्या शेअर्सनं दिला दीर्घकालीन नफा
स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यापासून टायटनच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन नफा दिला आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्याकडेही या कंपनीचे शेअर्स असायचे. आज बाजारात टायटनचे शेअर्स २,४६४.५० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.

१११ रिटेल शॉप्स उघडली
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा महसूल २९,०३३ कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप २.२० लाख कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने १११ नवीन रिटेल आउटलेट जोडले आहेत. यासह, ३६ नवीन Titan Eye+ स्टोअर उघडण्यात आली आहेत. 

कोणत्या व्यवसायात किती वाढ झाली?
टायटनच्या माहितीनुसार कंपनीने घड्याळे आणि वेअरेबल्स विभागात सुमारे १४ टक्के वाढ केली आहे. त्याच वेळी, नेत्रसेवा व्यवसायात वार्षिक आधारावर १० टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचा ज्वेलरी क्षेत्रातही मोठा व्यवसाय
टाटा कंपनीने ज्वेलरी ब्रँडमध्ये तनिष्क ब्रँडच्या नावाने नवी ओळख निर्माण केली आहे. २०२२ सालापर्यंत टायटनचा ज्वेलरी मार्केटमध्ये ६ टक्के वाटा होता. तनिष्क नंतर कंपनीने TITAN Eye Plus लाँच केले.

परफ्यूम आणि साडीतही बनवला ब्रँड
स्किन हा परफ्यूम ब्रँडही बाजारात दाखल झाला. या क्षेत्रातही कंपनीचा नावलौकिक आहे. यासह, २०१७ मध्ये कंपनीने साडी क्षेत्रातही प्रवेश केला. कंपनीने तनेरा नावाचा साडी ब्रँड सुरू केला. त्याचे पहिले स्टोअर बेंगळुरू येथून सुरू झाले.

Web Title: ratan tata company titan make brand as a watch perfume and jewellary titan shares gave bumper return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.