Join us  

Ratan Tata यांना नोएल टाटा यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नव्हता? बायोग्राफीतून अनेक गोष्टी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 3:57 PM

Ratan Tata यांचे चरीत्र पुस्कत नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये नोएल टाटा यांच्याविषयी अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.

Noel Tata : टाटा उद्योग समूह जगभर पोहचवण्यात दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्यानंतर आता ही जबाबदारी  नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, रतन टाटा यांचा आपला सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून समोर आलं आहे. टाटा ट्रस्ट अप्रत्यक्षपणे १६५ अब्ज डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहाला नियंत्रित करतो. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी मार्च २०११ मध्ये अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यात नोएल टाटा यांचाही समावेश होता. रतन टाटा यांनी उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना या निर्णयाचा नंतर पश्चाताप झाला असं त्यांचे चरित्र 'रतन टाटा ए लाइफ' या पुस्तकातून समोर आलंय. हे पुस्तक थॉमस मॅथ्यू यांनी लिहिले असून हार्परकॉलिन्स पब्लिशर्सने प्रकाशित केलंय.

टाटा समूहात अनेक उत्तराधिकारीपुस्तकात असे म्हटले आहे, की रतन टाटा निवड समितीपासून दूर राहिले. कारण टाटा समूहातील अनेक उमेदवार होते. एक सामूहिक संस्था एकमताने घेतलेल्या निर्णयावर आधारित त्यांच्यापैकी एकाची शिफारस करेल, असं त्यांना आश्वासित करायचे होते. निवड समितीपासून दूर राहण्याचे दुसरे कारण वैयक्तिक होते. कारण, असे मानले जात होते की त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांच्यानंतरचे नैसर्गिक उमेदवार आहेत. कंपनीतील पारशी आणि परंपरावादी समाजाच्या दबावादरम्यान, नोएल टाटा यांना 'आपल्यापैकी एक' मानले जात होते.

नोएल टाटा यांना अनुभव कमीलेखकाच्या मते, रतन टाटा यांच्यासाठी केवळ व्यक्तीची प्रतिभा आणि मूल्ये महत्त्वाची होती. नोएल टाटा यांची निवड झाली नाही तर त्यांना विरोधक म्हणून पाहिले जाऊ नये, अशी रतन टाटा यांची इच्छी होता. सर्वोच्च पदासाठी यशस्वीपणे स्पर्धा करण्यासाठी नोएलला आत्तापेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे. माझा स्वतःचा मुलगा असता तरी मी अशी व्यवस्था केली असते की तो थेट त्यांचा उत्तराधिकारी झाला नसता. कदाचित, यामुळेच रतन टाटा यांनी नोएल टाटा यांच्याऐवजी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदी बसवलं होतं.

टॅग्स :नोएल टाटारतन टाटाटाटा