गेल्या काही दिवसापासून उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली असल्याची बातमी व्हायरल झाली होती. आता या संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रतन टाटा यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.
Paytm वर ब्रोकरेज फर्मचा पुन्हा युटर्न, कमी केलं रेटिंग; आता 'हे' आहे टार्गेट
उद्योगपती रतन टाटा यांनी आज ट्विट करुन माहिती दिली. 'माझा कोणत्याही स्वरूपाच्या क्रिप्टोकरन्सीशी कोणताही संबंध नाही. "मी नेटिझन्सना विनंती करतो की कृपया जागरूक रहा. माझा कोणत्याही स्वरूपाच्या क्रिप्टोकरन्सीशी कोणताही संबंध नाही, असं ट्विट रतन टाटा यांनी केलं. रतन टाटा म्हणाले की, क्रिप्टोशी त्यांचा संबंधाचा उल्लेख करणारे कोणतेही लेख किंवा जाहिराती तुम्हाला दिसल्यास, ते पूर्णपणे असत्य आहेत आणि नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आहेत, असंही यात म्हटले आहे.
याआधी, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील या संदर्भात माहिती दिली होती. महिंद्रा यांनीही सांगितले होते की, मी यात एक रुपयाही गुंतवलेला नाही. काही दिवसापूर्वी त्यांच्याही नावे एक फेक बातमी व्हायरल झाली होती.
I request netizens to please stay aware. I have no associations with cryptocurrency of any form. pic.twitter.com/LpVIHVrOjy
— Ratan N. Tata (@RNTata2000) June 27, 2023